asur 2, asur 2 review, asur 2 starcast, asur 2 ott SAKAL
मनोरंजन

Asur 2 Review: रहस्यमयी कथानकाला पुराणाची जोड, अर्शद वारसी - अमेय वाघ यांचा असुर २ कसा आहे? वाचा review

अर्शद वारसी, वरुण सोबती, अमेय वाघ, रिद्धी डोग्रा अशा कलाकारांच्या वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिका आहेत.

Devendra Jadhav

Asur 2 Review News: गेल्या अनेक वर्षांपासून ज्याची सर्वांना उत्सुकता होती अशा गाजलेल्या असुर वेबसिरीजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

अर्शद वारसी, वरुण सोबती, अमेय वाघ, रिद्धी डोग्रा अशा कलाकारांच्या वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिका आहेत. कसा आहे असुर वेबसिरीजचा दुसरा सिझन. जाणून घेऊ..

(asur 2 review starring Arshad Warsi, Barun Sobti, amey wagh, ridhi dogra released on ott )

काय आहे कथा?

असुर सीझन 2 चे कथानक आणि पटकथा अत्यंत वेगळी आहे. ही कथा प्राचीन पौराणिक संकल्पना आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाभोवती फिरते.

या मालिकेत एक तरुण फॉरेन्सिक टेक निखिल नायर (बरुण सोबती), सिनियर फॉरेन्सिक एक्सपर्ट धनंजय राजपूत किंवा डीजे (अर्शद वारसी) आणि फॉरेन्सिक सायंटिस्ट नुसरत सईद (रिद्धी डोगरा) आहेत, जे खुनांची मालिका सोडवण्यासाठी एकत्र काम करतात.

शहरात घडणाऱ्या खुनांचे प्राचीन पौराणिक संबंध आहेत. बरुण आणि रिद्धी या दोघांनी उत्कृष्ट अभिनय केलाय.

अर्शद वारसीच्या दमदार अभिनयाने असुर २ ला एका वेगळ्या स्तरावर नेले. अर्शद या सीझनमध्येही पहिल्या सीझनप्रमाणे तीच चमक आणतो.

अर्शदचा अभिनय पाहणं ही एक परिपूर्ण ट्रीट आहे. याशिवाय या सिझनमध्ये अमेय वाघ, विशेष बन्सल, गौरव अरोरा त्यांच्या तीव्र, नकारात्मक भूमिका उठावदार आणि रंगतदार झाल्या आहेत.

शोमध्ये असे काही क्षण आहेत जे तुमच्या कायम लक्षात राहतील. आणि वेबसिरीज संपल्यानंतरही तुम्हाला त्यांचा विचार करत राहतात.

काय आवडणार नाही

असूर सीझन 2 ही एक उत्कृष्ट वेबसिरीज असली तरी त्यात काही कमतरता सुद्धा आहेत. सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे मूळ कथानक सुरु व्हायला वेळ लागतो आणि ज्यांनी पहिला सीझन पाहिला नाही त्यांच्यासाठी असुर २ पाहणे गोंधळात टाकणारे असू शकते.

याशिवाय संस्कृत भाषा आणि पौराणिक संदर्भांचा प्रचंड वापर, ज्यामुळे काही प्रेक्षकांना काही गोष्टी समजण्यास अडचण होऊ शकेल.

एकूणच पहिल्या सिझनमुळे प्रेक्षकांना असुर २ बद्दल जी उत्सुकता निर्माण झाली होती, दुसऱ्या सिझनकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांना असुर २ खरा उतरला आहे.

मराठमोळा अमेय वाघ सुद्धा सर्व प्रमुख कलाकारांसोबत तगडा अभिनय करून भाव खाऊन जातो. असुर २ चा अनुभव कायम लक्षात राहणारा आहे. असुर २ Jio Cinema या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT