at fighter movie event anil kapoor emotional while hrithik roshan praised him  SAKAL
मनोरंजन

Fighter Movie: हृतिक असं काय बोलला की अनिल कपूरांना अश्रू झाले अनावर, व्हिडीओ व्हायरल

'फायटर'च्या प्रमोशनदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Fighter Movie News: 'फायटर' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. 'फायटर' उद्या २५ जानेवारीला रिलीज होतोय. अनेकांनी 'फायटर'ची आगाऊ बुकींग केली आहे. त्यामुळे रिलीजआधीच 'फायटर'ला चांगली कमाई कमावली आहे.

'फायटर'चं प्रमोशन सध्या जोरात सुरु आहे. अशातच 'फायटर'चा जो प्रमोशनल इव्हेंट झाला त्यात हृतिक च्या बोलण्याने अनिल कपूर यांच्या डोळ्यात पाणी आलं.

'फायटर'च्या प्रमोशनदरम्यान संवाद साधताना हृतिक म्हणाला, "मी अनिल सरांना सेटवर पाहत त्यांच्याकडून शिकून मोठा झालो. तो सगळा काळ आठवला. माझ्यासाठी ते खूप प्रेरणादायी आहेत. आज जो काय हृतिक तुम्ही पाहत आहात, त्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात अनिल कपूर जबाबदार आहेत."

हृतिकने पुढे 'फायटर'च्या सेटदरम्यानचा एक किस्सा सांगितला. 'फायटर'मध्ये अनिल कपूर यांचा एक सीन होता. हृतिकने जेव्हा तो पाहिला तेव्हा त्याला लक्षात आले की त्यात अनिल सरांनी किती मेहनत घेतली असावी.

अनिल सरांनी त्या संपूर्ण प्रसंगाला नवीन भावनिक वळण दिले. त्यामुळे संपूर्ण चित्रपटाचा मार्ग निश्चित झाला, असंही हृतिकने व्यक्त केले. मी जेव्हा त्यांना सांगितलं आणि कौतुक केलं तेव्हा अनिल यांचे डोळे पाणावले होते. चार दशकं इतकं काम करुनही अजूनही अनेक गोष्टी करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे. त्यादिवशी मी त्यांना फक्त पाहत होतो आणि शिकत होतो.

हृतिक हे बोलत असतानाच अनिलला अश्रू अनावर झाले. मी इतक्या उदार अभिनेत्यासोबत काम केलेले नाही! असं म्हणत अनिलने हृतिकचं कौतुक केलं. 'फायटर' 25 जानेवारीला रिलीज होणार आहे.

हृतिक रोशन 'फायटर' निमित्ताने पहिल्यांदाच अनिल कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. फार कमी जणांना माहित असेल की हृतिकने त्याचे वडिल राकेश रोशन यांच्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.

राकेश रोशन यांच्या 'खेल' आणि 'कारोबार' यांसारख्या चित्रपटांमध्ये अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते. या सिनेमांसाठी हृतिकने वडिलांना साहाय्य केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL franchise sale Latest News : कुणी संघ विकत घेत का?, 'RCB' नंतर 'आयपीएल'मधील आणखी एक संघ विक्रिला!

Maharashtra Politics: पैशांच्या वाटपावरून वाद! बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Ajit Pawar : “बारामतीप्रमाणे मंचरचा चेहरामोहरा बदलू”- अजित पवारांची घोषणा!

Viral Video: 'अरे भाई, तो माझा मित्र आहे...', रांचीमध्ये पोहचताच रोहित शर्माची सुरक्षारक्षकासोबत 'बिहारी स्टाईल' मस्करी

बापरे! अभिनेता शशांक केतकर बेपत्ता, सिद्धार्थ जाधव घेऊन फिरतोय मिसिंगचे पोस्टर, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT