Suniel Shetty first statement after athia-rahul wedding,video viral Google
मनोरंजन

Athiya-Rahul च्या लग्नानंतर जावयासाठी हे काय बोलून गेला सुनिल शेट्टी..व्हिडीओ व्हायरल

सुनिल शेट्टीनं आथिया-राहूलचं लग्न लागल्यानंतर मीडियाला मिठाई वाटण्यासोबतच जावई-सासऱ्याच्या नात्यासंदर्भात काही वक्तव्य केलीयत ज्याची जोरदार चर्चा रंगलीय.

प्रणाली मोरे

Suniel Shetty first statement after athia-rahul wedding: अथिया शेट्टी आणि केएल राहूलचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात संपन्न झालं आहे. लग्नानंतर हे कपल मीडियासमोर येण्याआधी बॉलीवूडचा अण्णा म्हणजे सुनिल शेट्टी आणि अथियाचा भाऊ अभिनेता अहान शेट्टी मीडियासमोर आले होते. सुनील शेट्टी या प्रसंगी खूप खूश दिसला आणि त्यानं मीडियासमोर बातचीत केली. यावेळी मीडियाशी बातचीत करताना सुनिल शेट्टी जे म्हणाला ते त्याचं वक्तव्य जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

सुनिल शेट्टीनं या दरम्यान मीडियाशी बातचीत केली. अभिनेता म्हणाला- ''आता माझा रोल काही तसा नवीन नसेल. बापाचाच रोल असेल..राहूल माझा दुसरा मुलगाच आहे...हो पण आता अधिकृतरित्या सासरा बनलोयटट. हे बोलताना सुनिल शेट्टी खूप खूश दिसला..त्यानं हात जोडून मीडियाचे आभार मानले.

अथिया शेट्टी-केएल राहुलचं लग्न लागल्यानंतर सुनिल शेट्टी जसा बाहेर पडला तेव्हा त्याच्यासोबत काही लोकही नजरेस पडले. या सगळ्यांच्या हातात मिठाईचे मोठे बॉक्स होते. सुनिल शेट्टीनं आपला मुलगा अहानसोबत मिळून मीडियाला स्वतःच्या हातांनी मिठाईचं वाटप केलं.

लग्नात सुनिल शेट्टीनं लुंगी आणि कुर्ता घातला होता. तसंच गळ्यात मोत्यांचा हार घातला होता ज्यानं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या कपाळावर मोठा तिलक होता. तर अहाननं व्हाइट कलरची शेरवानी घातली होती. अथिया आणि केएल राहुलचं लग्न सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील बंगल्यात झालं. ज्यामध्ये बॉलीवूडपासून क्रिकेट जगतातील अनेक बड्या लोकांनी हजेरी राहिली होती. गेल्या काही दिवसांपासून या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT