KL Rahul And Athiya Shetty Wedding date ,venue..read details Instagram
मनोरंजन

KL Rahul- Athiya Shetty महाराष्ट्रात 'या' रम्य ठिकाणी बांधणार लग्नगाठ, समोर आली वेडिंग डेट..

केएल राहूल आणि अथिया शेट्टी हे पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीनं लग्न करणार असून चार दिवस हा लग्नसोहळा रंगणार आहे.

प्रणाली मोरे

KL Rahul- Athiya Shetty :गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटर केल राहूल आणि अभिनेत्री अथिया शेट्टीच्या लग्नाच्या चर्चा 'टॉक ऑफ द टाऊन' बनलेल्या आहेत. पण जेव्हा बातमी चर्चेत येते तेव्हा तेव्हा हे दोघंही चाहत्यांना नाराज करत या बातमीत काहीच तथ्य नसल्याचं नकळत सांगत आले आहेत. पण आता खबर पक्की आहे बरं का. दोघांच्या लग्नाची तारीखच समोर आलेली आहे. दोघांनीही आपल्या नात्याला लग्नबंधनात बांधायचं ठरवलेलं असून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हे दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. (KL Rahul And Athiya Shetty Wedding date ,venue..read details)

या दोघांच्या जवळच्या सूत्रानं एका वेबसाईटशी बातचीत करताना दोघांच्या लग्नाची तारीखच सांगून टाकली आहे. सूत्रानं सांगितल्यानुसार अथिया आणि केल राहूल २१ ते २३ जानेवारी २०२३ दरम्यान लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी देखील सुरू झाली आहे. अथिया शेट्टीच्या कुटुंबाकडून मात्र अद्याप यावर काही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

बोललं जात आहे की,अथिया आणि केएल राहूलचं लग्न हे पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीनं होणार आहे. तीन ते चार दिवस हा लग्नसोहळा रंगणार असून त्यात प्रत्येक दिवशी हळदी,मेहेंदी,संगीत आणि लग्न असे सोहळे विभागले जातील. लग्न हे सुनिल शेट्टीच्या खंडाळा येथील प्रशस्त 'जहान' बंगल्यावर होणार असल्याचं कळत आहे.

गेल्याच महिन्यात सुनिल शेट्टीनं मीडियासमोर अथिया आणि केएल राहूलच्या लग्नाविषयी विचारणा होताच, 'लवकरच लग्न होईल' असं म्हटलं होतं.

अथिया आणि केएल राहूलनं आपल्या रीलेशनशीपवर तेव्हा सर्वांसमोर शिक्कामोर्तब केलं जेव्हा अहान शेट्टीच्या पहिल्या सिनेमाच्या प्रीमीअरला ते उपस्थित राहिले होते. तसंच,त्यांच्या कुटुंबाकडूनच दोघांचे लग्न २०२३ मध्ये होईल असं सांगण्यात आलं होतं. आता केए राहूल आणि अथियानं आयत्यावेळेला काही बदल केले नाहीत तर नवीन वर्षात आणखी एक क्रिकेटर आणि बॉलीवूड स्टार लग्नबंधनात अडकतील हे निश्चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT