atif aslam viral video that his fan throw money and atif tell to donate this money during live concert in america  Esakal
मनोरंजन

Atif Aslam Video: "माझ्यावर पैसे उधळण्यापेक्षा..!" भर स्टेजवर अतिफने असं सुनावलं की सर्व बघतच राहिले

अतिफ अस्लमचा लाईव्ह शोमधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Atif Aslam News: अतिफ अस्लम हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय गायक. अतिफची गाणी अनेक जण आवडीने ऐकत असतात. अतिफने बॉलिवुडसाठी अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत.

अतिफ त्याच्या चाहत्यांच्या साक्षीने अनेक लाईव्ह शो करत असतो. अशातच अतिफच्या एका लाईव्ह शोमध्ये एक विचित्र प्रकार घडला ज्यामुळे त्याला शोमध्येच बंद करावा लागला. काय घडलंय जाणुन घेऊ सविस्तर.

(atif aslam viral video that his fan throw money)

अतिफ अस्लमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ज्यामध्ये अमेरिकेत अतिफच्या गायनाच्या लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान एका चाहत्याने त्याच्यावर नोटांचा वर्षाव केला.

नोटांचा वर्षाव होताच अतिफ थोडासा चलबिचल झाला. पुढे त्याने तात्काळ आपला परफॉर्मन्स थांबवला. तो म्हणाला. “माझ्या मित्रा, माझ्यावर नोटा फेकण्याऐवजी तुम्ही हे पैसे दान करू शकता,” गायक अतिशय दयाळूपणे म्हणाला. त्याने चाहत्याला स्टेजवर बोलावले आणि पैसे दान करण्यास सांगितले.

अतिफ पुढे त्या माणसाला म्हणाला “मला माहित आहे की तू खूप श्रीमंत आहेस आणि मला त्याचे खरोखर कौतुक वाटते. पण पैशांचा असा वर्षाव करणे हा त्यांचा अनादर आहे,” गायक म्हणाला.

लाइव्ह शो दरम्यान कलाकारांवर पैसे फेकून प्रेम व्यक्त करण्याची जगाच्या अनेक भागांमध्ये एक सामान्य परंपरा आहे. पण अतिफने या प्रेमाचा स्वीकार करताच नम्रपणे चाहत्याच्या भावनेचा आदर करत पैशांची उधळण थांबवली

अतिफ अस्लमचा हा दयाळूपणा सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. अतिफच्या या व्हिडीओवर अनेकांनी त्याचं कौतुक केलंय. "अतिफने परिस्थिती योग्यपणे हाताळली", असं अनेकांचं मत आहे.

अतिफने अलीकडेच पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी 15 लाख रुपयांची दान केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT