Jaane Jaa Song Atif Aslam's song Jaane Jaa pulled down after Anantnag terrorist attack bjp lodged complaint in santacruz police station esakal
मनोरंजन

Jaane Jaa Song: प्रसिद्ध गायक आतिफ अस्लमला मोठा धक्का, अनंतनाग मधील दहशतवाही हल्ल्यानंतर आता....

Vaishali Patil

Atif Aslam's song Jaane Jaa pulled down: अनंतनाग येथे बुधवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन अधिकारी शहीद झाले. जिल्ह्यातील एका दुर्गम गावात तीन दिवस चाललेल्या कारवाईत 3 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. मात्र या हल्ल्याचा परिणाम आता पाकिस्तानी गायक आतिफ असलमच्या नव्या गाण्यावर झाला आहे.

12 सप्टेंबर रोजी युनिव्हर्सल म्युझिकच्या लेबल 'VYRL' ने 'जाने जा' नावाचे एक गाणे रिलीज केले होते. हे गाणे किशोर कुमारच्या 'जाने जा' या गाण्याचे रिक्रिएट व्हर्जन आहे. जे पाकिस्तानी गायक आतिफने गायले आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

या गाण्यात सूरज पांचोली आणि निम्रत अहलुवालिया यांच्या भूमिका होत्या. मात्र आता हे गाणे युट्यूब आणि सर्वच प्लॅटफॉर्मवरुन काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत भाजप फिल्म्स अँड ड्रामा विभागाच्या उपाध्यक्षा हेनल मेहता यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत एक निवेदन जारी करत त्यांनी आतिफ अस्लमने गायलेले VYRL ओरिजिनल्स म्युझिक गाणे "जाने जा" च्या रिलीजचा निषेध केला होता.

12 सप्टेंबरला अनंतनागमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दिवशीच हे गाणे प्रदर्शित करण्यात आल्याने आता , त्यावर भाजप मुंबईच्या चित्रपट विभागाने आक्षेप घेतला आहे.

याबाबत म्युझिक कंपनीचा निषेध व्यक्त करत त्यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता आतिफचे हे गाणे कुठेच दिसत नसल्याने हे गाणे डिलीट करण्यात आल्याचं बोललं जात आहे. मात्र याबाबत आतिफ अस्लम आणि निर्मात्यांकडून काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

आतिफ बद्दल बोलायचं झालं तर त्याने 2002 मध्ये 'जल' नावाच्या बँडमधून गायनाची सुरुवात केली. महेश भट्टच्या 2005 साली 'जहर' चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीत त्याला पहिली संधी मिळाली.

या चित्रपटातील 'वो लम्हे' गाणे त्याने गायिले होते. त्यानंतर त्याने 'बेइंतहा', 'पहेली नजर में', 'तू जाने ना', 'तेरे संग यारा', 'जीना जीना', 'जीने लगा हूँ' अशी बरिच हिट गाणी गायली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune crime and politics: विषारी दारू, वाढते गुन्हे आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था; पुणे पोलिस व राज्य सरकारवर सुप्रिया सुळे यांचा निशाणा

Loni Kalbhor crime news: विषारी रासायनिक ताडी प्रकरणात लोणी काळभोरमध्ये आई-मुलगा अटकेत; घातक स्फटिकांसह मुद्देमाल जप्त

Polytechnic Student Death : छ. संभाजीनगर हादरलं! "माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?", संशयातून पॉलिटेक्निकच्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून, मुख्य संशयित फरार

IPL 2026, Video: एकट्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झुंज दिली, पण संघाने साथ सोडली; अश्विनचा राजस्थान रॉयल्सवर हल्लाबोल

Palghar: स्विमिंग पूलमध्ये खेळाताना पाण्यात पडला, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT