Avatar 2 Collection  esakal
मनोरंजन

Avatar 2 Collection : बॉलीवूड 300 कोटीत खुश, एकट्या 'अवतार'ची 83 अब्ज 84 कोटींची कमाई!

अवतारनं आपण काय चीज आहोत हे साऱ्या जगाला दाखवून दिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Avatar 2 the way of water james cameron : अवतारनं आपण काय चीज आहोत हे साऱ्या जगाला दाखवून दिलं आहे. जेम्स कॅमेरुन या दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटानं वेगवेगळे विक्रम आपल्या नावावर रचण्यास सुरुवात केली आहे. अवतार २ जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हाच हा चित्रपट सगळे रेकॉर्ड आपल्या नावावर करणार असल्याचे सिद्ध झाले होते.

अवतार द वे ऑफ वॉटरनं जगभरातून केलेल्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. भारतातूनही जेम्स कॅमेरुन यांच्या अवतारवर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या आहेत. आता अवतारनं केलेल्या अचाट कमाईचा आकडा समोर आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटानं जगभरातून १ बिलियनची कमाई केली आहे.

Also Read - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

अवतारनं एवढी शानदार कामगिरी करत आपल्याच पहिल्या चित्रपटाचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. अवतारच्या प्रिक्वेलने रेकॉर्ड नव्या अवतार द वे ऑफ वॉटरनं पार केलं आहे. दोन आठवड्यामध्येच अवतारनं ही कामगिरी करुन दाखवली आहे. अफलातून दिग्दर्शन, अचाट करणारं तंत्रज्ञान, प्रभावी ग्राफीक्स आणि गुंगवून टाकणारं संगीत या सारं अवतारविषयी सांगता येईल. अवतार ही सर्वात वेगानं एक अब्जची कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

अवतारनं त्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ घेतला आहे. भारतीय रुपयांमध्ये केलेली कमाई सांगायची झाल्यास ८२ अब्ज ८४ कोटी ९५ लाख रुपयांची कमाई केली आहे. यावरुन अवतारच्या अचाट कामगिरीचा अंदाज आल्याशिवाय राहणार नाही. तब्बल तेरा वर्षांच्या ब्रेकनंतर कॅमेरुन यांनी अवतारचा दुसरा भाग प्रेक्षकांसमोर आणला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Punjab Sanjeev Arora ED Action: पंजाबचे कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा यांना अटक, ईडीचे संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात छापे

Shaktipeeth Highway Land Acquisition : शक्तिपीठ महामार्गासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया; राज्य सरकारकडून अंतर्गत हालचालींना वेग

अवधूत गुप्तेंच्या आवाजातील 'तुंबाडची मंजुळा'मधील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला! सोशल मीडियावर होतेय चर्चा

साखळी बॉम्बस्फोटामागंच मोठं सत्य उलगडणार, 'मिशन’ च्या ट्रेलरमधून मोठी हिंट समोर

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये वडकीत 58 जनावरांची सुटका, तिघांना अटक

SCROLL FOR NEXT