Avatar 2 Twitter Review: twitter review rating,netizen says, its a magic Google
मनोरंजन

Avatar 2 Twitter Review: अफाट..अद्भूत..अचाट..'अवतार 2 ' पाहून भारावलं पब्लिक!

जेम्स कॅमरून दिग्दर्शित 'अवतार द वे ऑफ वॉटर' सिनेमा आज प्रदर्शत झाला अन् सोशल मीडियावर सिनेमाच्या कौतूकाला पूर आलेला पहायला मिळत आहे.

प्रणाली मोरे

'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाची वाट जगभरातील चाहते गेल्या अनेक दिवसांपासून पाहत होते. आज सिनेमा अखेर जगभरात प्रदर्शित झाला आहे. जेम्स कॅमरून यांच्या अवतार सिनेमाचा हा सीक्वेल आहे. सिनेमातील मोशन पिक्चर आणि व्हीएफक्सनं प्रेक्षकांचे मन जिंकलंय असं चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे.(Avatar 2 Twitter Review: twitter review rating,netizen says, its a magic)

'अवतारः द वे ऑफ वॉटर' या सिनेमाची प्रेक्षकांची प्रतिक्षा आता संपली आहे,आणि सर्वच अवतार चाहत्यांनी आता थिएटरची वाट पकडली आहे. लोक ट्वीटरवर सिनेमातील सीन्सच्या काही इंट्रेस्टिंग क्लीप शेअर करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. कोणी याला व्हिज्युअल ट्रीट म्हटलं आहे तर कोणी ब्लॉकबस्टर सिनेमा.

Avatar 2 Twitter Review: twitter review rating,netizen says, its a magic

ट्वीटरवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली आहे की- ''तांत्रिकदृष्ट्या हा सिनेमा खूपच कमाल आहे. क्वाट्रिच बदला घ्यायला परत आला आहे,मग सुली आपल्या कुटुंबाचे रक्षण करेल का?,वॉटर सीक्वेन्स तर अद्भूत आहेत सिनेमात.''

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे-''अवतार २ चा रिव्ह्यू- सिनेमातील अनेक गोष्टी एक भन्नाट अनुभव देतात. कुटुंबाच्या अवतीभोवती हा सिनेमा फिरतो.#AvtarTheWayOfWater''.

एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं आहे की,''तुम्हाला माझ्याकडून 'अवतार २' चा रिव्ह्यू जाणून घ्यायचा आहे का? मी खूप थोडक्यात सुंदर रिव्ह्यू देतो. हा सिनेमा म्हणजे मॅजिकल अनुभव आहे, पहिल्या भागाच्या तुलनेत हा नवा भाग तुम्ही अधिक एन्जॉय कराल. जेम्स कॅमरुनने खूप अद्वीतीय काम केलं आहे आणि मी सल्ला देईन की सिनेमा थिएटरमध्येच जाऊन पहा''.

आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,''अवतार म्हणजे मास्टरपिस. लागलीच तिकीट बूक करा''.

'अवतार: द वे ऑफ वॉटर' जेम्स कॅमरून दिग्दर्शित एक कमाल सायन्स फिक्शन आहे. अवतारचा हा भाग पेंडोका आणि त्याच्या स्वदेशी लोकांच्या कहाणीला पुढे घेऊन जाते. या सिनेमात सेम वर्थिंग्टन,जो सलदाना,सिगोरनी,वीवर,स्टीफन लैंग,केट विसंलेट,क्लिफ कर्टिस आणि जोएल डेव्हिड मूर सारख्या हॉलीवूडच्या कलारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. रिपोर्ट्सनुसार,समोर आलं आहे की ५ लाखाहून अधिक तिकिट्स या सिनेमाच्या विकल्या गेल्या आहेत. बोललं जात आहे की, प्रभासच्या 'बाहुबली २' चा रेकॉर्ड तोडून हा सिनेमा आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा पहिला हॉलीवूड ओपनर ठरू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT