James Cameron shares tentative release date
James Cameron shares tentative release date esakal
मनोरंजन

Avataar 3 Released Date 'अवतार ३' येतोय, दिग्दर्शकानं सांगितली रिलीज डेट! 'पँडोरा' ग्रहावर नव्यानं काय घडणार

युगंधर ताजणे

James Cameron shares tentative release date : हॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांच्या अवतारच्या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. एका आगळ्या वेगळ्या विषय आणि संकल्पनेची मांडणी त्यांनी अवतारच्या माध्यमातून केली होती. अवाक् करणारं तंत्रज्ञान, वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण, त्याला सुंदर ग्राफीक्सची जोड आणि अद्भुत छायाचित्रण यामुळे अवतारचे दोन्ही भाग प्रेक्षकांच्या प्रचंड कौतुकाचा विषय होता.

आपण जे काही करु ते उच्च दर्जाचे असायला हवे. असा ध्यास कॅमेरुन यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून जोपासला आहे. त्यांच्या टायटॅनिक नावाच्या चित्रपटानं मनोरंजन विश्वात मोठा इतिहास घडवला. दहापेक्षा जास्त ऑस्कर आपल्या नावावर करणाऱ्या या चित्रपटामुळे कॅमेरुन यांची लोकप्रियता जगभर पसरली. त्यानंतर त्यांना अवतारचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जाऊ लागले.

Life Balance जाणून घ्या हा 'वेक अप काॅल' आणि बना सर्वार्थाने समृद्ध

अवतार द वे ऑफ वॉटरनं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली होती. कित्येक हजार कोटींची कमाई करुन हा चित्रपट कमाईच्याबाबत अग्रेसर राहिला. या सगळ्यात अवतारच्या तिसऱ्या भागाची चर्चा सुरु झाली आहे. पिंकव्हिलानं याविषयीचे सविस्तर वृत्त दिले आहे. कॅमेरुन यांनी एका मुलाखतीमध्ये अवतारच्या तिसऱ्या भागाविषयी कमेंट केली आहे. त्याचवेळी त्यांनी अंदाजे एक तारीखही सांगितली आहे.

प्रचंड खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रियेचा भाग होऊन बसलेल्या अवतार या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेली दादही तितकीच मोठी आहे. कॅमेरुन यांनी न्युझीलंडमधील एका टीव्ही शो ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, दोन वर्षांचा काळ निघून गेला आणि पुन्हा अवतार ३ च्या पोस्ट प्रॉडक्शनची चर्चा होऊ लागली. आम्ही देखील त्याच्या तिसऱ्या चित्रपटासाठी उत्सूक आहोत. २०२५ च्या ख्रिसमसध्ये हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येण्याची शक्यता असल्याचे कॅमेरुन यांनी म्हटले आहे.

अवतारच्या तिसऱ्या चित्रपटाचे नाव अद्याप फायनल झाले नसून त्याबाबत कॅमेरुन यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. आतापर्यत अवतारच्या दोन्ही चित्रपटांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. गेल्या वर्षी तांत्रिक विभागातून अवतार द वे ऑफ वॉटरला मानाचा ऑस्करही प्राप्त झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT