Jeremy Renner Accident esakal
मनोरंजन

Jeremy Renner Accident : 'ॲव्हेंजर्स'चा स्टार जेरेमीचा गंभीर अपघात, बर्फ हटवताना...

ॲव्हेंजर्सच्या मालिकेनं जगभरातील प्रेक्षकांना वेडं केलं होतं. भारतातही तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

सकाळ डिजिटल टीम

Avengers Jeremy Renner Hollywood actor Captain America : ॲव्हेंजर्सच्या मालिकेनं जगभरातील प्रेक्षकांना वेडं केलं होतं. भारतातही तिचा चाहतावर्ग मोठा आहे. आता या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता जेरेमी रेनरचा अपघात झाला आहे. त्याला गंभीर दुखापतही झाली आहे. त्याच्या अपघाताची बातमी व्हायरल होताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

गंभीर दुखापत झाल्यानं त्याला एअरलिफ्ट करुन एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घराबाहेरचा बर्फ हटवण्यासाठी गेलेल्या जेरमीला मोठा अपघात झाला आहे. त्याची प्रकृती अजुनही गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये जेरमीनं आपल्या प्रकृतीविषयी सांगितले होते. त्यात आता त्याचा अपघात झाल्यानं चाहत्यांना धक्का बसला आहे.

Also Read - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की

न्यु इयरच्या पूर्वसंध्येला जेरमीच्या घराबाहेर मोठा बर्फवर्षाव झाला होता. त्याचे घर नॉर्थ नेवादा याठिकाणी आहे. अशावेळी जवळपासच्या ३५ हजार घरांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. अनेकांना ब्लॅकआऊटचा सामना करावा लागला होता. अशावेळी जेरमीच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात बर्फ साचले होते. त्यात त्याचा अपघात झाला. तो गंभीर जखमी झाला आहे.

जेरमीच्या एका प्रवक्तत्यानं सांगितलं आहे की, जेरमीवर उपचार सुरु आहेत. तो उपचारांना प्रतिसादही देत आहे. जेरमी हा जगभरात लोकप्रिय असणारा अभिनेता आहे. अॅव्हेंजर्सच्या सीरिजनं त्याला लोकप्रिय केले आहे. कॅप्टन अमेरिकामध्येही त्याची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Abitkar : पालकमंत्री पहिल्यांदा एवढे चिडले, कोल्हापूर महापालिकेच्या कारभारावर सगळ्याचं अधिकाऱ्यांना चांगलाच धुतला; काय घडलं नेमकं?

Kolhapur Politics : सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर यांच्यात जुंपली, मागच्या दरवाजाने निवडून येणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय कळणार?

Vijay Deverakonda Net Worth: रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्यात सर्वात श्रीमंत कोण? किती आहे संपत्ती?

मोठी बातमी : भारतात 'चिकन' खाऊन आजारी पडले क्रिकेटपटू; एकाला तातडीने दाखल करावे लागले हॉस्पिटलमध्ये

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वादात; 'क्लब टेंडरिंग'ची चर्चा, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पडसाद उमटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT