ayesha Takiya bollywood actress 
मनोरंजन

Viral Video : कोण आहे 'ही' ओळखा पाहू? एकेकाळी सलमानच्या हिट चित्रपटाची होती नायिका!

विमानतळावर तिला (Ayesha Takiya Viral Video) पाहताच अनेकांनी तिला ओळखलेच नाही. त्या व्हिडिओवरील कमेंटस भन्नाट आहेत.

युगंधर ताजणे

Bollywood Actress viral Video : तुम्ही जर सलमानचा वाँटेड (Salman Khan Wanted Movie) नावाचा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला आयशा टाकीया कोण हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आता त्याच आयशाचा विमानतळावरील व्हायरल (Ayesha Takia Actress) झालेला लूक हा नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरतो आहे. तिला पाहिल्यानंतर अनेकांनी ओळखलेच नसल्याचे दिसून आले आहे.

आयशा आता बॉलीवूडपासून लांब गेली आहे. लग्नानंतर तिचं आयुष्य (Ayesha Takia spotted at airport News) बदलून गेलं आहे. ती कौटूंबिक जीवनात व्यस्त झाली आहे. सध्या तिचा विमानतळावरील एक व्हिडिओ नेटकऱ्यांच्या कौतुकाचा आणि प्रतिक्रियेचा विषय आहे. तिला पाहिल्यानंतर हीच का ती आयशा जी पहिल्यांदा सलमान सोबत दिसली होती. असा प्रश्न त्या व्हिडिओवरुन नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

विरल भयानीच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तो व्हिडिओ व्हायरल (Ayesha Takia spotted at airport Viral Video Latest news) झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आयशानं डार्क ब्ल्यू रंगाचा सलवार सूट परिधान केला आहे. तिनं काळ्या रंगाचे मास्कही लावले आहे. जेव्हा फोटोग्राफर्सनं तिला फोटो देण्यासाठी विनंती केली तेव्हा आयशानं चेहऱ्यावरील मास्क हटविल्याचे दिसून आले. यावेळी तिच्या सोबत तिचा मुलगा मिखेल देखील होता.

काय म्हणाले नेटकरी...

कमेंट बॉक्समध्ये नेटकऱ्यांनी आयशावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं म्हटलं आहे की, तू किती सुंदर अभिनेत्री होतीस पण आता तू तर ओळखू देखील येत नाहीस. समोर आली तरी तुला ओळखता येणं कठीण आहे. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काहींना तर ती अभिनेत्री आयशा टाकिया आहे हे लक्षात आलेलं नाही.

लग्नानंतर बॉलीवूडपासून लांब गेली!

आयशाचा शेवटचा चित्रपट २०११ साली आलेला मोड होता. तो बऱ्यापैकी लोकप्रिय देखील झाला होता. तिचा श्रेयस तळपदे सोबतचा डोर नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय ठरला होता. २००९ मध्ये तिनं बॉयफ्रेंड फरहान आझमीसोबत लग्न केले. फरहान हा समाजवादी नेते अबू आझमी यांचा मुलगा असून लग्नानंतर तिनं इस्लाम धर्म स्विकारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT