मनोरंजन

आयुषमान आता तिहेरी भूमिकेत; परंतु चित्रपटात नाही! मग कुठे, वाचा

सकाळ वृत्तसेवा


मुंबई ः अभिनेता आयुषमान खुरानाने आतापर्यंत विविध चित्रपट आणि विविध भूमिका साकारल्या आहेत. त्याचे लागोपाठ आलेले बहुतेक चित्रपट यशस्वी ठरले आहेत. सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील खणखणीत नाणे म्हणजेच आयुषमान खुराना. आपल्या प्रत्येक भूमिकेत त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.

सहज आणि संदर अभिनय ही त्याची खासियत. बरेली की बर्फी, आर्टिकल १५, अंधाधून असे काही सुपरहिट चित्रपट त्याच्या नावावर आहेत. ड्रीमगर्ल या चित्रपटात त्याने एका मुलीची व्यक्तिरेखा साकारली आणि खूप धमाल उडविली होती. हा चित्रपटेखील सुपरहिट झाला होता.

आता आयुषमान पुन्हा एकदा मुलीची भूमिका साकारीत आहे. पण ती चित्रपटात नसून एका जाहिरातीसाठी आहे. विशेष बाब म्हणजे या जाहिरातीसाठी तो तिहेरी भूमिका साकारीत आहे. एक वडील, त्यांचा मुलगा आणि त्या मुलाच्या पत्नीची भूमिका तो करीत आहे. एकाच वेळी  तिहेरी भूमिका अर्थात ट्रिपल बार आयुषमान उडविणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT