Ayushmann Khurrana Moye Moye Video 
मनोरंजन

Ayushmann Khurrana : आयुषमानलाही पडली 'मोये मोये' ची भुरळ, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ते गाणं, चाहत्यांच्या उत्साहाला उधाण

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुराणा हा आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे.

युगंधर ताजणे

Ayushmann Khurrana Moye Moye Video : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुराणा हा आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याचे कारण तो व्हिडिओ. यामध्ये त्यानं सध्या चर्चेतील मोये मोये गाण्यावर व्हिडिओ शेयर केला आहे. त्यावरुन त्याला नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांना सामोरं जावं लागलं आहे.

बॉलीवूडच्या कित्येक सेलिब्रेटींना देखील त्या मोये मोये गाण्याची भुरळ पडल्याचे दिसून आले आहे. यावेळी आयुषमानच्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या मोये मोयेचा जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रेंड सुरु असून अनेकांनी त्यात सहभाग घेतला आहे.

Life Balance जाणून घ्या हा 'वेक अप काॅल' आणि बना सर्वार्थाने समृद्ध

आयुषमान खुराणाचीही आता त्या सेलिब्रेटींमध्ये पडली आहे ज्यांनी यापूर्वी मोये मोये गाण्यावर रिल्स किंवा व्हिडिओ केले आहे. आयुषमाननं देखील त्या गाण्यावर एक वेगळा व्हिडिओ केला आहे. जो आता सोशल मीडियावर ट्रेंड होतो आहे. त्याच्या चाहत्यांनी आयुषमान फॅन पेजवरुन तो व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यात आयुषमान हजारो लोकांच्या उपस्थितीत स्टेजवर ते गाणं गातो आहे. यावर आयुषमान प्रतिक्रिया देताना म्हणतो की मी ट्रेंडसाठी हे गाणं गात नाही तर केवळ गायचं म्हणून ते म्हटले आहे.

मोये मोये काय आहे?

गेल्या काही दिवसांपासून मोये मोये हे गाणं प्रचंड उत्सुकता आहे.त्यावरुन सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाणही आले आहे. खरंतर ते एक सर्बियन गाणं आहे. प्रसिद्ध गायिका टेया डोरानं ते गाणं गायलं आहे. गाण्याचा अर्थ वाईट स्वप्न असं आहे. याच वर्षी हे गाणं प्रदर्शित झालं असून ते मुळ गाणं मोये मोर असं असल्याचे सांगण्यात येत आहे.

या गाण्याबद्दल आणखी सांगायचं झाल्यास ते दु:ख व्यक्त करणारे गाणे आहे. हे गाणे अचानक ट्रेंडिंग आणि व्हायरल झाल्यामुळे लोकांनी या गाण्यावर अचानक रील्स बनवायला सुरुवात केली. याची सुरुवात TikTok वरून झाली आणि नंतर Instagram, Facebook आणि YouTube वर या गाण्याचे अनेक रिल्स व्हिडिओ बनवले जाऊ लागले जे खुप व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT