Ayushmann Khurrana OPENS UP about his wife Tahira Kashyap's book on their sex life Google
मनोरंजन

आयुषमानच्या पत्नीनं त्यांच्या 'sex life' चा केला खुलासा; अभिनेता नाराज?

ताहिरा कश्यपनं काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीच्या शो मध्ये आयुषमान सोबतचं आपलं सेक्सलाइफ आणि इतर अनेक पर्सनल गोष्टींवर भाष्य केलं होतं.

प्रणाली मोरे

आयुषमाननं (Ayushmann Khurrana)अंडर कव्हर एजंटची भूमिका साकारली आहे. आयुषमान सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. या दरम्यान त्यानं एक मोठा खुलासा केला आहे की, त्यानं आपली पत्नी ताहिरा कश्यपचं (Tahira Kashyap) प्रसिद्ध पुस्तक 'द 7 ऑफ बिझंग अ मदर' वाचलेलं नाही. हे तेच पुस्तक आहे ज्यामध्ये ताहिरानं आयुषमानसोबतच्या आपल्या सेक्स लाइफ(Sex Life) विषयी मोठे खुलासे केले आहेत.

ताहिरा कश्यपने या पुस्तकात खुलासा केलाय की, आपल्या मुलासाठी पम्प केलेलं ब्रेस्ट मिल्क तिच्या नवरा प्यायला होता. तसंच तिनं या पुस्तकाच्या प्रमोशन निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की,''मुलं झाल्यानंतर ती आयुषमानसोबत हनिमूनला गेली होती,पण तो हनिमून फारसा यशस्वी ठरला नाही''. आयुषमानने पत्नीच्या या चर्चेत असलेल्या पुस्तकासंदर्भात बोलताना म्हटलं आहे की,''मी हे पुस्तक अद्याप वाचलेलं नाही''. तो असं देखील म्हणाला आहे की,''हे पुस्तक काही वाचकांना केवळ मनोरंजन वाटेल,पण हे पुस्तक केवळ मनोरंजन या गटात मोडत नाही''.

फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा आयुषमानला विचारलं गेलं की,' एक वाचक आणि पती म्हणून तुझ्या पत्नीचं हे पुस्तक कसं वाटलं तुला ?' तेव्हा तो म्हणाला,''वाचक म्हणू नक्कीच हे पुस्तक वाचनीय आहे असं मी म्हणेन. पण खरं सांगायचं तर मला स्वतःच्या पर्सनल गोष्टी लोकांशी शेअर करायला आवडत नाहीत. माझी पत्नी माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. मला माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलणं आवडत नाही. आणि आम्ही दोघं याबाबतीत खूप वेगळे आहोत. अनेकांसाठी माझ्या पत्नीचं पुस्तक एंटरटेनिंग असेल कदाचित पण मी ते अजून वाचलेलं नाही''. 'तहिरानं तुमचे बैडरुम सीक्रेट्स सगळ्यांसमोर मांडले तेव्हा तुला कसं वाटलं?' हे विचारल्यावर आयुषमान म्हणाला,''मला माहित नाही हे. तिच्या मनात जे येतं ते ती बोलून दाखवते,करते, पण मी तसा माणूस नाही''.

ताहिरा कश्यप आणि आयुषमान खुरानानं २००८ मध्ये लग्न केलं होतं. दोघांमध्ये शाळेपासून मैत्री आणि प्रेम होतं. आयुषमान आणि ताहिरा आता दोन मुलांचे आई-बाबा आहेत. वरुष्का आणि विराजवीर अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. शिल्पा शेट्टीच्या शो मध्ये काही दिवसांपूर्वी ताहिरा कश्यप पोहोचली होती. तेव्हा तिनं आपल्या सेक्स लाईफविषयी उघडपणे भाष्य केलं होतं. ताहिरानं म्हटलं होतं,''सेक्स वर्कआऊटचाच एक भाग आहे. छोट्याशा वेळात देखील तो आपली कॅलरी बर्न करायला मदत करतो''. असं ताहिरा म्हणाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT