Dream Girl 2 First Look:  Esakal
मनोरंजन

Dream Girl 2 First Look: पूजाच्या सौंदर्यासमोर सगळ्या अभिनेत्री फिक्या! आयुष्मानच्या ड्रीम गर्लला पाहिलं का?

Vaishali Patil

Dream Girl 2 First Look: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना हा त्याच्या 'ड्रीम गर्ल 2' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे . त्याचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयुष्मान खुरानाचा हा चित्रपट 25 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

'ड्रीम गर्ल 2' चित्रपटाच्या रिलीजच्या महिना आधी आज चित्रपटाच्या निर्मात्यांनी आयुष्मान खुरानाच्या या चित्रपटातील फर्स्ट लुक शेअर केला आहे.


आयुष्मान खुरानाने याआधीही 'ड्रीम गर्ल 2' चे प्रोमो शेयर केले होते. ज्यामध्ये तो अभिनेत्यांसोबत बोलतांना दिसला होता. त्यात त्याने पठाण म्हणजेच शाहरुख, रणबीर, रणवीर यांच्यासोबत फोनवर गप्पा मारल्या होत्या.

मात्र त्याने त्याचा चेहरा दाखवला नव्हता . आता आयुष्मान खुरानाने 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटातील त्याचा म्हणजेच पूजाचा फर्स्ट लूक सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

आयुष्मान खुरानाने शेअर केलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तो पूजाच्या भूमिकेत आपल्या हातात लिपस्टिक पकडून आरशात बघताना दिसतोय. मात्र आरशाच्या दुसऱ्या बाजूला आयुष्मान खुराना दिसत आहे.

पूजाची झलक शेयर करत आयुष्मानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'ही फक्त पहिली झलक आहे. आरशात दिसणाऱ्या वस्तू या खऱ्या दिसण्यापेक्षा सुंदर असतात.

आयुष्मानचा 'ड्रीम गर्ल 2' मधील हा फर्स्ट लूक सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या या फोटोवर कमेंट करत आहेत. त्याच्या चित्रपटाची प्रतिक्षा आणखीणच वाढली आहे.

या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडेसोबत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातुन ते पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेयर करणार आहेत. 2019 मध्ये आलेल्या आयुष्मानच्या हिट सिनेमा 'ड्रीम गर्ल'चा हा सिक्वेल आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य करत आहेत. तर आयुष्यमान आणि अन्यनासोबत यात अन्नू कपूर, परेश रावल, सीमा पाहवा, विजय राज, मनोज जोशी, राजपाल यादव आणि असरानी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 25 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होइल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat HC: Zoom मीटिंग नाही कोर्ट आहे! शौचालयातू सुनावणीला हजर राहून फसला, कोर्टाने ठोठावली शिक्षा... पोटासह खिसाही रिकामा

Pune Railway Station: पुणे स्थानकावर ‘ब्लॅक बॉक्स’ सारखी यंत्रणा; व्यवस्थापक, चालक यांच्या संभाषणाचे होणार रेकॉर्डिंग

Satara Fraud:'साताऱ्यातील एकाची ४३ लाखांची फसवणूक'; पाच जणांवर गुन्हा दाखल,वाळू ठेका देण्याचे दाखवले आमिष

Ashadhi Wari:'माउलींच्या पालखीचे लोणंदमध्ये स्वागत'; दर्शनासाठी भाविकांची गर्दी; निरोप देताना अनेकांचे पाणावले डोळे

Fauja Singh : जगप्रसिद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी अपघाती निधन, रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक

SCROLL FOR NEXT