Ayushmann Khurrana On Working With Amitabh Bachchan 
मनोरंजन

अमिताभ बच्चन म्हणजे...? नेमकं 'या' अभिनेत्याला बिन बी बद्दल काय वाटतंय, कोण आहे तो अभिनेता...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : सुपरस्टार अभिनेता अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट आज अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला.

हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या निमित्ताने बिग बी अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली असून या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे. त्यातच अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा नेमका अनुभव कसा होता. हे आयुषमान खुरानाने असे सांगितलं की, 'गुलाबो सिताबो’ या चित्रपटाच्या निमित्ताने मला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.

बिग बी हे एक उत्तम कलाकार असण्यासोबतच एक चांगले सहकलाकारही आहेत. त्यांच्यात आजही एक लहान मुल दडलेलं आहे. त्यांच्यासोबत काम करण्यापूर्वी मला सतत असं वाटायचं की ते गंभीर स्वभावाचे आहेत. परंतु तसं अजिबात नाही.  त्यांच्यात कामाचा प्रचंड उत्साह आणि अभिनयाची आवड असल्याचं दिसून येतं. मला सतत असं वाटायचं की त्यांच्यामुळे सेटवर शांत आणि शिस्तबद्ध वातावरण असेल. मात्र तसं अजिबात नव्हतं. त्यांच्यामुळे सेटवर कायम खेळीमेळीचं वातावरण असायचं.ते प्रचंड बोलक्या स्वभावाचे आहेत. तसेच अमिताभ बच्चन हे स्वार्थी स्वभावाचे नसून कायम इतर कलाकारांना मदत करणारे आहेत, असे आयुषमान म्हणाला. 

‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात आयुषमान आणि अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिकेत झळकले आहेत. गुलाबो सिताबो’ या चित्रपटात बिग बींनी मिर्झा ही भूमिका साकारली असून आयुषमान हा  बांके या भूमिकेत पाहायला मिळाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa highway toll news : मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली होणार नाही, पालकमंत्री राणेंचा विश्वास; सिंधुदुर्गवासीयांना दिलासा

MS Dhoni: घरच्या मैदानावर तरी थालाचं दर्शन होणार? गुजराविरूद्धच्या सामन्यापूर्वी CSK चे कोच काय म्हणाले?

Latur Accident: रुग्णाला नेताना रुग्णवाहिकाच आजारी; रॉड तुटला, भर उन्हात भाजलेल्या रुग्णाच्या वेदनांत भर!

Drowning Incident: खडकीत आईसह दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील घटना, सरपण आणायला गेले अन् तिघांचा जीव गेला..

Kolhapur Accident News : डंपर पंक्चर झाला म्हणून थांबला अन्, जिवावर बेतला; समोर जळत होता पण...

SCROLL FOR NEXT