Prabhas Instagram Account Disabled: Esakal
मनोरंजन

Prabhas: प्रभासच्या मागची साडेसाती संपेने! बाहूबलीच्या इन्स्टाग्राम अकाउंटसोबत कुणी केली छेडछाड?

Vaishali Patil

Prabhas Instagram Account Disabled: साउथ सुपरस्टार प्रभास हा सध्या त्याच्या सालार या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा टिझर रिलिज झाला असून प्रभासचे चाहते त्याच्या या चित्रपटाची उत्सुकतेने प्रतिक्षा करत आहे. अशातच आता प्रभास संदर्भात एक वाईट बातमी समोर आली आहे. ज्यानंतर प्रभासच्या चाहत्यांची निराशा होणार आहे.

प्रभासचे इन्स्टाग्राम अकाउंट डिलिट झाले आहे. सोशल मीडियावरील प्रभासच खात गायब झाल्याची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही प्रभासचे अकाउंट शोधत असाल तर ते मिळणार नाही. त्यामुळे प्रभासच्या चाहत्यांमध्ये थोडा गोंधळ निर्माण झाला आहे.

प्रभासने स्वत: त्याचे अकाउंट डिलीट केले आहे का अशी चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे तो त्याच्या आगामी सिनेमा 'सालार: भाग 1- सीझफायर' या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना अचानक असे काय झाले काय झाले की प्रभासने त्याचे अकाउंट डिलिट केले असे अनेक प्रश्न प्रभासचे चाहते त्याला विचारत आहेत.

आता प्रभासने स्वत: त्याचे सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले आहे की कोणीतरी त्याचे अकाउंट हॅक केले आहे. याबाबतची माहीती प्रभास किंवा त्याची टीमच सांगू शकेल. मात्र या प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. प्रभास याबाबत लवकरच खुलासा करेल अशी त्याच्या चाहत्यांना आशा आहे.

तर दुसरीकडे प्रभासच्या टिमने याबाबत एक ट्विट शेयर करत याबाबत माहीती दिली आहे. "प्रभास अण्णांच्या इंस्टाग्राम अकाउंटसोबत काही छेडछाड झाली आहे. ती सोडवण्याचा टीम करत आहे." असे सांगितले आहे.

प्रभास साऊथ इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडमध्येही खूप लोकप्रिय आहे. त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. काही दिवसांपुर्वी प्रभासचे फेसबुक पेज हॅक झाले होते. प्रभासनं स्वत: ट्विट आणि इंस्टाग्रामला पोस्ट करत सांगितलं आहे. आता त्याचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याच्या चर्चा आहेत.


काही दिवसांपुर्वी प्रभास 'आदिपुरुष'मध्ये क्रिती सेनन सोबत दिसला होता. आता प्रभास अॅक्शन-थ्रिलर सालार पार्ट 1: सीझफायरमध्ये आणि 'प्रोजेक्ट के' म्हणजेच 'कल्की 2898' या चित्रपटात दिसेल.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT