babil khan got her father bollywood actor irrfan khan mysterious diary
babil khan got her father bollywood actor irrfan khan mysterious diary 
मनोरंजन

असं काय आहे त्या डायरीत, व्हिडिओ होतोय व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता इरफान खानच्या अभिनयाचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांनी हिंदी चित्रपटांसोबतच, हॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. ते कॅन्सर रोगासोबत लढा देत होते. 29 एप्रिल 2020 रोजी मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमधील एक मोलाचा हिरा गमावला अशी हळहळ  दिग्गजअभिनेत्यांनी आणि त्यांच्या चाहत्यांने व्यक्त केली. भारत सरकार आणि राजकीय नेते यांनी इरफानच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. 

इरफान खान यांचा मुलगा बाबिलने नुकताच एक व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये इरफान खानची डायरी दिसत आहे. बाबिलने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन लिहीले,' मला माझ्या वडिलांच्या कपाटात ही नोटबुक मिळाली. ती वही मी 12 वर्षांचा असताना त्यांना दिली होती. यामध्ये त्यांनी माझ्यासाठी अभिनयाच्या काही टिप्स लिहील्या आहेत. मला वाटतय की फिल्म स्कुलनंतर त्यांना मला शिकवायचे होते. त्यामुळे मला असे वाटत आहे की माझ्या हातात खजाना सापडला आहे. मी तुमच्यासोबत यातील काही नोट्स शेअर करतो, कारण माझी इच्छा आहे की, तुम्ही विचार करावा की मी चांगला माणूस आहे.' बाबिलला अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. सध्या तो परदेशात शिक्षण घेत आहे.  

इरफान यांनी अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नेमसेक, स्लमडॉग मिलियोनेर, लाइफ ऑफ पाय या इंग्रजी चित्रपटांमध्ये इरफान खानने काम केले आहे. पानसिंग तोमर, मकबूल, लाईफ इन मेट्रो या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. तसेच प्रसिध्द मालिका भारत एक खोजमध्ये देखील इरफानने काम केले. २०११ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT