Irrfan Khan and Babil Khan Sakal
मनोरंजन

Babil On Father Irrfan Khan Birthday: इरफान खानच्या मृत्यूनंतर बाबिलची झाली होती अशी अवस्था, 45 दिवस स्वत:ला...

इरफानच्या जाण्यानंतर त्याचा मुलगा बाबीलची प्रकृती बिघडली होती. बाबिलने एका मुलाखतीत वडिलांच्या निधनानंतरच्या त्याच्या स्थितीबद्दल सांगितले आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खान आपल्या वडिलांची आठवण करून भावूक होत आहे. आज इरफान खानचा वाढदिवस आहे. इरफान खान आज जिवंत असता तर तो त्याचा 56 वा वाढदिवस साजरा करत असता. चाहत्यांच्या हृदयात इरफानचं वेगळं स्थान आहे, जे इतर कोणी घेऊ शकत नाही. इरफानच्या जाण्यानंतर त्याचा मुलगा बाबीलची प्रकृती बिघडली होती. बाबिलने एका मुलाखतीत वडिलांच्या निधनानंतरच्या त्याच्या स्थितीबद्दल सांगितले आहे.

वडील इरफान यांच्या निधनाबद्दल बोलताना अभिनेता बाबिलने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'ज्यावेळी मी ही बातमी ऐकली तेव्हा माझा विश्वास बसत नव्हता. माझ्यासाठी हा सर्वात वाईट काळ होता आणि त्या वेळी मी संपूर्ण 45 दिवस स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले होते.

बाबिलने पुढे सांगितले की, 'त्यावेळी पप्पा शूटिंगमध्ये खूप व्यस्त असायचे. त्यांच्या मृत्यूनंतर, असे वाटायचे ते घरी उशिरा येतील. नंतर मला समजले की ते आता त्यांच्या कधीही न संपणाऱ्या शूटसाठी गेले आहे. मी माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला मित्र गमावला आहे. हे असे दुःख आहे जे शब्दात व्यक्त करता येणार नाही.

वडिल इरफान खान यांच्या पावलावर पाऊल ठेवत बाबिलनेही चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. नुकताच बाबिलचा 'काला' हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्यामध्ये बाबिलच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT