babubhai latiwala passed away who produced salman khan movie veergati  SAKAL
मनोरंजन

Babubhai Latiwala: सलमान खानच्या वीरगती सिनेमाचे निर्माते बाबूभाई लतीवाला यांचं निधन

बाबूभाई आणि सलमान खान यांचं खास कनेक्शन होतं

Devendra Jadhav

प्रसिद्ध निर्माते बाबूभाई लतीवाला यांचं निधन झालंय. वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये पहाटे 2 वाजता त्यांचे निधन झाले.

बॉम्बिनो व्हिडीओ ही बाबूभाई लतीवाला यांची कंपनी होती. बॉम्बिनो व्हिडिओ या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 1995 मध्ये सलमान खानच्या वीरगती सिनेमाचीची निर्मिती केली होती. त्यामुळे बाबूभाई लतीवाला यांचं सलमान खानसोबत खास कनेक्शन होतं.

(babubhai latiwala passed away who produced salman khan movie veergati)

बाबूभाईंच्या जवळच्या सहकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाबूभाईंची अंतिमदर्शन आज दुपारी ४ वाजता त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आलंय. त्यांचं निवासस्थान - ९०२, ब्रीझी हाईट्स, शेर्ली राजन रोड, रिझवी लॉ कॉलेजच्या पुढे, वांद्रे पश्चिम येथून त्याची अंतिमयात्रा निघेल. नमाजनंतर सांताक्रूझ कब्रिस्तान त्यांच्यावर रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात येतील.

बाबूभाईंनी वीरगती चित्रपटाची निर्मिती केली होती. १९९८ साली आलेल्या तिरछी टोपीवाले या सिनेमाचे लेखक, निर्माते म्हणून बाबूभाई लतीवाला यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

वीरगती सिनेमात सलमान खान सोबतच पूजा डडवाल आणि फरीदा जलाल यांच्या प्रमुख भुमिका होत्या. तर तिरछी टोपीवाले सिनेमात चंकी पांडे, मोनिका बेदी, इंदर कुमार, आलोक नाथ आणि कादर खान मुख्य भूमिकेत होते.

बाबूभाईंच्या निकटवर्तीयाने सांगितले की, बाबूभाई एक लो-प्रोफाइल माणूस. बाबूभाई ऑकलंडमध्ये काही काळापासून स्थायिक झाले होते.

मृत्यूआधी काही दिवस ते भारतात होते असा आमचा अंदाज आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे आम्हाला सांगण्यात येत आहे. बाबूभाईंच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 21st Installment : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजनेचा २१वा हप्ता केला जारी

U19 World Cup 2026 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! भारताचे सामने कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या

Anmol Bishnoi: अखेर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला भारतात आणलं; NIA कडून अटक, कसा बनला भारतातील 'मोस्ट वॉन्टेड'?

Mumbai Crime: पाणी भरण्यावरून वाद; महिलेचं डोकं फिरलं; घरातून मॉस्किटो किलर स्प्रे आणलं अन्...; व्यक्तीसोबत नको ते घडलं

LinkedIn Workforce Survey: एआयमुळे बदलतंय मुंबईचं बिझनेस लँडस्केप, लिंक्डइनच्या सर्व्हेत समोर आले धक्कादायक आकडे

SCROLL FOR NEXT