Baby John Teaser 
मनोरंजन

Baby John Teaser: अॅटलीच्या 'बेबी जॉन'चा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज; वरुण धवनच्या जबरदस्त लूकनं वेधलं लक्ष

Baby John Teaser: 'बेबी जॉन'या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Baby John Teaser: प्रसिद्ध दिग्दर्शक ॲटलीचा (Atlee) 2023 मध्ये रिलीज झालेला 'जवान' (Jawan) हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. आता अॅटली 2024 मध्ये पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. अॅटलीच्या आगामी चित्रपटात अभिनेता वरुण धवन हा प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं नाव 'बेबी जॉन' असे आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

धमाकेदार टीझर रिलीज!

'बेबी जॉन' या चित्रपटाच्या टीझरमध्ये वरुण हा सिंहासनावर बसलेला दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला बंदुका दिसत आहेत. टीझरच्या शेवटच्या सीनमध्ये वरुण ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे.

'बेबी जॉन' ची स्टार कास्ट

बेबी जॉन या चित्रपटात वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. बेबी जॉनचे वर्षा हा या वर्षातील सर्वात मोठा ॲक्शन एंटरटेनर असणार आहे, असा अंदाज टीझर पाहिल्यानंतर लावला जाऊ शकतो. या चित्रपटात वरुण ॲक्शन मोड दिसणार आहे. तो शत्रूंसोबत लढताना देखील दिसणार आहे.

पाहा टीझर:

कधी रिलीज होणार बेबी जॉन?

बेबी जॉन हा चित्रपट 31 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कालीस्वरण यांनी केले आहे. ॲटली आणि मुराद खेतानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. बेबी जॉन हा तामिळ चित्रपट 'थेरी' चा हिंदी रिमेक आहे.

चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान वरुण धवन झाला होता जखमी

बेबी जॉन या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान वरुणच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबाबत चाहत्यांना माहिती दिली होती. या चित्रपटात वरुण पहिल्यांदाच साऊथ स्टार कीर्ती सुरेशसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता जवान प्रमाणेच अॅटलीच्या बेबी जॉन या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana Hospitalized : माजी खासदार नवनीत राणा रूग्णालयात दाखल; २५ दिवस 'बेडरेस्ट' असणार!

Raju Shetty: ''उद्यापासून एकही साखर कारखाना चालवू देणार नाही'' प्रशासनासोबतची शेट्टींची बैठक निष्फळ

PM Modi Meet Indian Women Cricket Team : विश्वविजयी महिला क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदी करणार 'ब्रेकफास्ट'? , भेटीची तारीख ठरली!

HSC Exam Form : बारावीच्या परीक्षेचे अर्ज विलंब शुल्काने भरण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Pune Crime : 'त्या' पोलिस उपनिरीक्षकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी; घरझडतीत ५१ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT