background dancer to successful actress Kajal Aggarwal struggle story sakal
मनोरंजन

कलाकारांच्या मागे नाचणारी काजल अग्रवाल आज साऊथसह बॉलीवुडही गाजवतेय..

अभिनेत्री काजल अग्रवालचा वाढदिवस, तिच्या स्ट्रगल बद्दल ही खास माहिती..

नीलेश अडसूळ

Kajal Aggarwal Birthday : सिंघम फेम अभिनेत्री काजल अग्रवालचा आज (१९ जून) वाढदिवस. आज तिचा ३७ वा वाढदिवस असून चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री काजल अग्रवाल एकेकाळी कलाकारांच्या मागे बॅकग्राऊंड डान्सर म्हणून नाचत होती. तिच्या या स्ट्रगल विषयी आज जाणून घेऊया... (background dancer to successful actress Kajal Aggarwal struggle story)

काजलला लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. यामुळे तिने ‘बॅकग्राउंड डान्सर’ म्हणून करिअरला सुरुवात केली होती. सुरवात केली तिने बॉलीवुडमध्ये काम मिळवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. मग तिने दाक्षिणात्य चित्रपटात (south film industry) आपल्या अभिनयाची जादू दाखवली आणि ती साऊथची राणी झाली. टॉलीवुडने तिला खरी ओळख मिळवून दिली. पुढे 2011मध्ये तिने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक केले आणि बॉलिवूडही गाजवले.

काजलने 2004 मध्ये ‘क्यूं हो गया ना’ या हिंदी चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले. या चित्रपटात काजलने ऐश्वर्या रायच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर काजल तमिळ दिग्दर्शक भारतीराजाच्या ‘बोमलट्टम’ या चित्रपटात दिसली. या चित्रपटात तिच्यासोबत अर्जुन सर्जा आणि नाना पाटेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. पुढे 2007मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’मध्ये अभिनेता कल्याण रामसोबत तेलगूमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तीचा ‘चंदामामा’ हा चित्रपट सुपरहिट चित्रपट ठरला. 2009 मध्ये रिलीज झालेल्या एसएस राजामौली यांच्या ‘मगधीरा’ या ऐतिहासिक चित्रपटात ती दुहेरी भूमिकेत होती. या चित्रपटातील तिच्या कामाचे विशेष कौतुक झाले.

साऊथमध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर काजलने 2011मध्ये पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. नशिबाने तिला अजय देवगणसोबत ‘सिंघम’ चित्रपटातून पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळाली. रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’ चित्रपटामध्ये काजल अग्रवाल आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत होते. यानंतर, काजल ‘स्पेशल 26’, ‘दो लफ्जों की कहानी’, ‘मुंबई सागा’ या बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकली. सध्या काजलच्या अभिनयाची आणि कामाची साऊथसह बॉलीवुड मध्येही बरीच हवा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Yojana: आता भारताचा भाषिक वारसा संरक्षित होणार! नव्या योजनेची घोषणा, 'ज्ञान भारतम' योजना म्हणजे नेमकी काय?

Video: हेच खरंखुरं स्वातंत्र्य! पुणे महागनर पालिकेच्या सुरक्षेची कमान तृतीयपंथीयांच्या हाती

Latest Marathi News Live Updates : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठीतून खास शुभेच्छा,पाहा एकापेक्षा एक सुंदर मॅसेज

Independence Day: ...म्हणून देश एकसंध राहिला, नाहीतर...; इतिहास सांगत काँग्रेस नेते मोदींना नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT