Badshah Music Video Controversy esakal
मनोरंजन

Badshah Music Video Controversy: बादशाहला 'सनक' पडलं महागात! FIR दाखल..

Vaishali Patil

प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह हा अडचणी सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच कारण आहे बादशाहच नुकतचं प्रदर्शित झालेला 'सनक' नावाचा नवीन अल्बम. त्याचे हे गाणे वादाचा विषय बनले आहे.


महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यासह अनेक भाविकांनी गाण्यात भोलेनाथच्या नावाचा अश्लिल शब्द वापरल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. त्यांनी गाण्यातून देवाचे नाव काढून माफी मागण्यास सांगितले आहे. माफी न मागितल्यास बादशाहविरोधात उज्जैनसह अन्य शहरांमध्ये एफआयआर दाखल करण्यात येईल, असा इशाराही दिला.



वास्तविक, नुकताच बादशाह 'सनक'चा अल्बम रिलीज झाला आहे. 2 मिनिटे 15 सेकंदांचे हे अल्बम गाणे खूप ट्रेंड करत आहे. या गाण्यात शिवीगाळ, सेक्स असे अनेक शब्द वापरण्यात आले आहेत. या गाण्यात तो स्वत:ला भोलेनाथचा भक्त म्हणतं त्याची साथ त्याला आहे असं म्हणत आहे. अशा गाण्यांमध्ये भोलेनाथांचा वापर करून स्वतःला शिवभक्त म्हणवून घेतल्याने भक्त संतापले आहेत. या गाण्याला आतापर्यंत 18 लाख लोकांनी पाहिले आहे.


महाकाल मंदिराचे ज्येष्ठ पंडित महेश पुजारी हे याबद्दल बोलतांना म्हणतात की, हिंदू सनातनमध्ये ज्या प्रकारची सूट दिली जाते त्याचा लोक चुकीचा फायदा घेत आहेत. चित्रपट स्टार असो की गायक, देवाच्या नावाने अश्लीलता पसरवण्याचा अधिकार कोणालाही नाही. अशा लोकांवर देशभर कारवाई व्हायला हवी. 'महाकाल बाबा की सेना' आणि 'हम पुजारी महासंघा'सह हिंदू संघटनांनी तात्काळ या गाण्यातून भगवान भोलेनाथ यांचे नाव हटवण्यास सांगितले आहे.



वास्तविक, नुकताच बादशाह 'सनक'चा अल्बम रिलीज झाला आहे. 2 मिनिटे 15 सेकंदांचे हे अल्बम गाणे खूप ट्रेंड करत आहे. या गाण्यात शिवीगाळ, सेक्स असे अनेक शब्द वापरण्यात आले आहेत. या गाण्यात तो स्वत:ला भोलेनाथचा भक्त म्हणतं त्याची साथ त्याला आहे असं म्हणत आहे. अशा गाण्यांमध्ये भोलेनाथांचा वापर करून स्वतःला शिवभक्त म्हणवून घेतल्याने भक्त संतापले आहेत. या गाण्याला आतापर्यंत 18 लाख लोकांनी पाहिले आहे.

बादशाहने बॉलिवूड आणि पंजाबी गाण्यांमध्ये आपल्या रॅपने खास ओळख निर्माण केली आहे.  बरेचदा तो काहीतरी नवीन करण्याच्या नादात वादात अडकतात. बादशाहने काला चष्मा, हाय गरमी, लेट्स नाचो, पाणी-पानी आणि आंख लड जावे यांसारखी प्रसिद्ध गाणी गायली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT