bahubali lockdown version 
मनोरंजन

बाहुबलीचं लॉकडाऊन व्हर्जन, खुद्द दिग्दर्शकाने शेअऱ केला VIDEO

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. भारतासह अनेक देशांनी कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन केलं आहे. अद्याप कोरोनावर औषध सापडलं नसून त्यावर सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव उपाय आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास पाच लाख इतकी झाली आहे. अशा परिस्थितीत अनेक राज्यांचे सरकार, केंद्र सरकार आणि सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. 

कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनात सध्या भीतीचं वातावरण आहे. यामुळे प्रत्येकजण त्यापासून वाचण्यासाठी खबरदारी घेताना दिसत आहे. यातच सोशल मीडियावर आता बाहुबलीचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये बाहुबली आणि भल्लालदेव म्हणजेच प्रभास आणि राणा दग्गुबाती लढताना दिसत आहेत. मात्र यात दोघांनीही मास्क घातल्याचं दिसतं. 

बाहुबलीमधील या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना कोरोना बाबत जनजागृतीचा संदेश दिला जात आहे. बाहुबलीचे दिग्दर्शक एसएस राजामौळी यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी म्हटलं की, मला आशा आहे की सर्वजण सुरक्षित असतील आणि याकाळात लोक काळजी घेतील. आता माहिष्मतीमध्येही मास्क घालणं गरजेचं आहे. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाला आहे. प्रभासच्या चाहत्यांनीही याला पसंती दिली आहे. 

2015 मध्ये आलेल्या मेगाबजेट चित्रपट बाहुबलीने देशासह जगभरात बॉक्स ऑफिसवर धमाका करत विक्रम नोंदवले होते. या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या कहानीपासून अॅक्शन सीन आणि सर्व कलाकारांचा अभिनयही प्रेक्षकांना आवडला होता. चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने बाहुबलीची भूमिका साकारली होती. तर राणा दग्गुबातीने चित्रपटातील खलनायक भल्लालदेवची भूमिका केली होती. याशिवाय चित्रपटात अनुष्का सेट्टी, रम्या कृष्णन, सत्यराज, तमन्ना भाटिया हे सुद्धा दिसले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

Bullock Cart Race Accident : बैलांच्या पायात अडकला तरुण, बैलगाडीखाली चिरडले जाताना सुदैवाने बचावले; शर्यतीत दुचाकीस्वारांचा थरकाप उडवणारा अपघात

कथानकातील ढिसाळपणा पडला भारी ! ठरलं तर मगचा टीआरपी घसरला, स्टार प्रवाहची 'ही' मालिका ठरली गेमचेंजर

Horoscope : उद्या बनतोय संकष्टी लाभ योग! पुढचे तीन दिवस 'या' 3 राशींसाठी गोल्डन टाइम; पैशाची अडचण होईल दूर, अडकलेल्या कामांची पूर्ती

SCROLL FOR NEXT