यशस्वी अभिनेत्री ते निर्माती; अनुष्का शर्मा काय म्हणतेय तिच्या प्रवासाबद्दल..

anushka sharma
anushka sharma

मुंबई : नव्या दमाच्या दिग्दर्शक तसेच कलाकार व तंत्रज्ञ यांच्याबरोबर काम केल्याने नवनवीन कल्पना येतात. त्यांच्याबरोबर काम केल्याने एक प्रकारचा उत्साह वाढतो आणि उर्जाही निर्माण होते. त्यामुळे नवीन मंडळींबरोबर काम करण्यास मी केव्हाही प्राधान्य देते. माझ्या चित्रपट व वेबसीरीजवर तुम्ही नजर टाकली तर मी नवीन लोकांबरोबर किती काम करते हे सिद्ध होईल, असे म्हणणे आहे अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचे.

यशस्वी अभिनेत्री आणि यशस्वी निर्माती म्हणून अनुष्का शर्मा खंबीरपणे या इंडस्ट्रीत उभी आहे. यशराज बॅनर्सच्या 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटाद्वारे तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिचा नायक होता किंग खान अर्थात शाहरूख. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला. सन 2008 मध्ये हा चित्रपट आला होता. त्यानंतर 'बॅण्ड बाजा बारात', 'जब तक है जान', 'पतियाला हाऊस', 'पीके', 'सुलतान', 'बॉम्बे वेलवेट' अशा कित्येक चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर ती चित्रपट निर्मितीकडे वळली.  'एनएच 10' या चित्रपटाची पहिल्यांदा
निर्मिती केली आणि दोन ते तीन चित्रपट तिने बनविले. त्यानंतर काही वेबसीरीजची निर्मिती केली. अभिनेत्री ते निर्माती असा यशस्वी प्रवास तिने सुरू केला आहे.

बॉलिवूडमध्ये बुद्धिमान, प्रतिभावान 'आऊटसाइडर्स'ना नशीब अजमावण्यासाठी संधी देण्याची आपली तीव्र इच्छा होती आणि मी माझ्या चित्रपटात दिली, असेही अवघ्या 25 व्या वर्षी निर्माती बनलेली अभिनेत्री सांगते. 'एनएच 10' या अनुष्काच्या पहिल्या निर्मितीमध्ये दिग्दर्शक नवदीप सिंग, नील भूपलम आणि दर्शन कुमार हे अभिनेते आणि लेखक सुदीप शर्मा (पटकथा) अशा काही आऊटसाइडर्सचा समावेश होता. या टीमनेच या वर्षीचा सर्वोत्कृष्ट भारतीय डिजिटल शो ठरलेल्या 'पाताललोक'ची निर्मिती तिच्यासाठी केली. 'फिलौरी'मध्ये अनुष्काने दिग्दर्शक अन्शई लाल, अभिनेत्री मेहरीन पिरजादा यांच्यासोबतच संगीतकार शाश्वत सचदेव यांनी संधी दिली. शाश्वत यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

'परी' या तिच्या तिसऱ्या निर्मितीमध्ये अनुष्काने नवोदित दिग्दर्शक प्रोशित रॉय यांना संधी दिली. 'पाताललोक'मध्ये दिग्दर्शक अविनाश अरुण यांना संधी देत जयदीप अहलावत, नीरज काबी, अभिषेक बॅनर्जी, निहारिका लायरा दत्त अशा अनेकांना तिने पुढे आणले. 'बुलबुल'मध्ये तिने दिग्दर्शक अन्विता दत्ता हिला पहिलीवहिली संधी दिली.

अनुष्का म्हणते, "आमच्या सिनेमांना आजवर मिळालेल्या यशाचा आम्हाला अभिमान वाटतो. 'क्लीन स्लेट फिल्मस्' सुरू केली तेव्हापासूनच देशभरातील नव्या प्रतिभांचा शोध घेऊन त्यांना सातत्याने संधी देत आहोत. आम्ही हे काम सुरूच ठेवणार आहोत." 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com