prabhas  team esakal
मनोरंजन

'बाहूबली' ठरला आशियातील सर्वात 'हँडसम मॅन'

बाहुबलीनं बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला.

युगंधर ताजणे

मुंबई - ज्या चित्रपटानं भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अमीट ठसा उमटविला त्या बाहुबलीमधील (bahubali) अभिनेत्याचा जगाला वेगळ्या अर्थान परिचय झाला आहे. त्याचे काय आहे की, आमरेंद्र बाहुबली (amrendra bahubali) अर्थात प्रभास हा आशिया खंडातील सर्वात सुंदर अभिनेता ठरला आहे. त्याच्या चाहत्यांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. बाहुबलीनं बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. आतापर्यत सर्वाधिक कमाई केलेला भारतीय चित्रपट म्हणून बाहुबलीचे रेकॉर्ड आहे. ते अजूनही अबाधित आहे. त्याच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. (bahubali star prabhas the most handsome man in the asia these actors are also include top10 list yst88)

साऊथ चित्रपट सृष्टीतून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या प्रभासचा आता मोठा सन्मान होतो आहे. त्याचा समावेश आशिया खंडातील सर्वात 'हँडसम मॅन' म्हणून केला गेला आहे. प्रभास हा काही केवळ भारतातच नाही तर जगभरात त्याच्या अभिनयामुळं प्रसिद्ध झाला आहे. त्याला त्याच्या अभिनयानं वेगळी ओळख मिळवून दिली आहे. विशेषत; तो बाहुबली पासून सर्वांच्या नजरेत भरला. या चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये त्यानं काम केलं होतं. ते सर्वांना कमालीचं आवडलं.

बाहूबली नंतर प्रभासकडे वेगवेगळ्या चित्रपटांची रांग लागली होती. त्यानंतर त्यानं हिंदी चित्रपट क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला. तिथेही तो हिट झाला. तो घेत असलेल्या मानधनाची सगळीकडे चर्चा होती. आता त्याच्या झालेल्या गौरवामुळे पुन्हा एकदा त्याच्याकडे निर्माते आणि दिग्दर्शकांची रांग लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. काही दिवसांपूर्वी 2021 मधल्या सर्वात सुंदर अशा व्यक्तींची यादी जाहिर करण्यात आली आहे. त्यात प्रभासनं सर्वांना मागे सोडले आहे. त्याचे नाव पहिले आहे.

त्या यादीमध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान, साऊथ कोरियाचा किम ह्युन जूंगला मागे सोडलं आहे. यावेळी या यादीमध्ये मनोरंजन क्षेत्रातील प्रख्यात अभिनेता आणि मधुबाला फेम व्हिवियन डिसेनाचं देखील नाव त्यात आलं आहे. टॉप 10 मध्ये जगभरातील अनेक कलाकारांचा समावेश आहे. मात्र त्यात प्रभासचे नाव आघाडीवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT