Baipan Bhaari Deva Box Office Collection: Esakal
मनोरंजन

Baipan Bhaari Deva Box Office Collection: ना आयटम साँग ना बोल्डनेस! सहा महिलांच्या गँगनं बॉक्स ऑफिसवर आणलं वादळ

Vaishali Patil

Baipan Bhaari Deva Box Office Collection: महिलांनी भरगच्च भरलेलं चित्रपटगृह आणि एकच आवाज 'बाईपण भारी देवा'.. असंच काहीतरी चित्र सध्या सगळ्या थिएटरमध्ये दिसत आहे. मराठमोळा साज करुन बचत गट असो, किटी पार्टी, सोसायटीचा महिला ग्रुप सगळ्यांना बाईपण भारी देवा पहायचा आहे. या चित्रपटाने थिएटर हाऊसफुल्ल झाली आहेत. हा चित्रपट पाहून झाल्यावर सोशल मडियावर या चित्रपटाबद्दल महिला फिडबॅकही देत आहेत.

त्यामुळेच या चित्रपटाला फुल टू माउथ पब्लिसीटी मिळत आहे. त्यातच चित्रपटाची कथा, त्याला घातलेली भावनिक साद आणि चित्रपटातील कमाल गाणी यामुळे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. याचाच फायदा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दिसत आहे.

बॉक्स ऑफिसवर महिलांची गाडी सुसाट निघाली आहे. या गाडीने 50 कोटींचा स्टेशन गाठलं आहे. आता ही गाडी 100 कोटींच्या स्टेशनकडे वळाली आहे. प्रेक्षकांच्या प्रेमाचा हा स्पिड असाच कायम असला तर बाईपण भारी देवा ची गाडी लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करेल अशी शंका नाकारता येत नाही.

३० जून रोजी प्रदर्शित झालेल्या 'बाईपण भरी देवा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या या चित्रपटात सहा अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने लाखो मने जिंकली. त्यांच्या अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.

फक्त 5 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट अनेक रेकॉर्ड करत आहे. आतापर्यंत चित्रपटाने पन्नास कोटींचा आकडा पार केला. अशाप्रकारे तो २०२३ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट ठरला.

या चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन 62 कोटींच्या वर पोहोचले आहे. एवढेच नाही तर एका दिवसात 6.10 कोटींचा गल्ला जमावत हा मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा सिंगल डे कलेक्शन करणारा चित्रपट ठरला आहे.

सॅकल्निकच्या अहवालानुसार, 'बाईपण भरी देवा'ने मंगळवारी चांगली कमाई केली आहे. रिलिज्या 19 व्या दिवशी या चित्रपटाने 2.20 कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. अशा प्रकारे या चित्रपटाने आता 55.30 कोटींचा गल्ला जमावला आहे. आता लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पाही पार करेल असा विश्वास प्रेक्षकांना आहे.

रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने आणि दीपा परब यांच्या मुख्य भूमिका साकारलेल्या सर्व अभिनेत्रींवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Toilet Hygiene Tips for Women: UTI थांबवण्याची सर्वात सोपी पद्धत; महिलांनी न चुकता फॉलो केल्या पाहिजेत 'या' हायजिन टिप्स

Mumbai News: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, पण सुरक्षा कच्ची! बीएमसी मुख्यालयातील बॅग स्कॅनर बंद; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Tenancy Agreement Rule: भाडेकरू आणि घरमालकांनो लक्ष द्या... सरकारकडून ‘नवीन भाडे करार २०२५’ लागू; काय आहेत नवे नियम?

Dondaicha News : दोंडाईचा नगर परिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय; नगराध्यक्षांसह ७ नगरसेवक बिनविरोध

SCROLL FOR NEXT