baipan bhaari deva marathi movie is not first choice for movie name this is real name  SAKAL
मनोरंजन

Baipan Bhaari Deva: 'बाईपण भारी देवाचं' खरं नाव काय होतं माहितीये?

बाईपण भारी देवा हे नाव जरी हटके असलं तरीही सिनेमाच्या सुरुवातीला हे नाव नव्हतं

Devendra Jadhav

Baipan Bhaari Deva News: बाईपण भारी देवा हा सिनेमा सध्या प्रेक्षकांची चांगली गर्दी मिळवत आहे. बाईपण भारी देवा सिनेमा रिलीज होऊन अनेक दिवस झाले आहेत. सिनेमा पहायला महिलांचा ग्रुप जातोय.

पण विशेष गोष्ट म्हणजे पुरुष प्रेक्षकांनी सुद्धा बाईपण भारी देवा पहायला गर्दी केलीय. बाईपण भारी देवा हे नाव जरी हटके असलं तरीही सिनेमाच्या सुरुवातीला हे नाव नव्हतं. मग काय होतं नाव, आम्ही तुम्हाला सांगतो.

(baipan bhaari deva marathi movie is not first choice for movie name this is real name)

बाईपण भारी देवा चा लेखक ओंकार दत्तने याचा खुलासा केलाय. बाईपण भारी देवा चा मधील शशी म्हणजेच अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जेव्हा पहिल्यांदा स्क्रीप्ट देण्यात आली, त्यावेळचा फोटो ओंकारने पोस्ट केलाय.

या स्क्रीप्टवर बाईपण भारी देवा नाही तर वेगळं नाव दिसतंय. स्क्रीप्टवर मंगळागौर हे नाव दिसतंय. याचाच अर्थ बाईपण भारी देवा नाही तर सिनेमाचं सुरुवातीचं नाव मंगळागौर असणार होतं.

बाईपण भारी देवा हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा सिनेमाने प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवलाय.

या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर पकड मिळवण्यास यश मिळवलंय. बाईपण भारी देवा रिलीज होऊन आज आठवडा पूर्ण झाला.

आठवड्याभरात या सिनेमाने विक्रमी गल्ला जमवलाय. सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदेंनी यांनी बॉक्स ऑफीस रिपोर्ट शेयर केलाय.

केदार शिंदेंनी बाईपण भारी देवा सिनेमाचा लेटेस्ट बॉक्स ऑफीस रिपोर्ट शेयर केलाय. रिपोर्टनुसार बाईपण भारी देवा सिनेमाने केवळ आठवड्याभरातच साडेबारा कोटींचा (12.50 CR) गल्ला जमवलाय.

बाईपण भारी देवा सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठी सिनेमांची चलती आहे. असं म्हणता येईल. या वर्षी केदार शिंदेंचे महाराष्ट्र शाहीर आणि आता रिलीज झालेला बाईपण भारी देवा हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma तयारीला लागला.... ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणारच! Photo पाहून चाहते खूश; सर्फराजलाही दिलेत बॅटिंगचे धडे

Latest Marathi News Updates : मुंबई गुन्हे शाखेची कारवाई : अवैध कॉलसेंटरचा भांडाफोड, 93 जणांविरुद्ध गुन्हा

Kirkitwadi News : शिक्षणासाठी धोक्याची वाट! खडकवासला पुलावर पाणी साचून जीव धोक्यात

Pune News : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरसावले पोलिस दल; नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन प्रभावीपणे राबविणार, शस्त्रसज्ज पोलिसांचा पहारा

Accident News : दीड कोटी खर्चूनही रस्ता जीवघेणा: नामपूरमध्ये कंटेनरच्या धडकेत वृद्ध महिला ठार

SCROLL FOR NEXT