baipan bhaari deva movie box office record even clash between gadar 2 and omg 2 kedar shinde SAKAL
मनोरंजन

Baipan Bhaari Deva: गदर 2 असो वा OMG 2; बाईपण 'भारी'च देवा! बॉक्स ऑफीसवर रचला नवा इतिहास

बॉलिवूड सिनेमांशी टक्कर देऊनही बाईपण भारी देवा या मराठी सिनेमाने स्वतःचं अस्तित्व कायम ठेवलंय

Devendra Jadhav

Baipan Bhaari Deva: बाईपण भारी देवा सिनेमाची हवा अजुनही ओसरत नाही. सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड गाजला. इतकंच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर परदेशातही सिनेमाची खुप हवा झाली. मृणाल ठाकूर, सोनाली बेंद्रे अशा बॉलीवूड सेलिब्रिटींनी सुद्धा बाईपण भारी देवाचं कौतुक केलं.

अशातच बाईपण भारी देवा सिनेमाने बॉक्स ऑफीसवर नवीन इतिहास रचला आहे. बाईपण भारी देवा सिनेमाने ५० दिवस पूर्ण केलेत शिवाय कमाईचा आकडा सुद्धा वाढला आहे.

(baipan bhaari deva movie box office record even clash between gadar 2 and omg 2)

बाईपण भारी देवा चा नवा रेकॉर्ड

बाईपण भारी देवा सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे आणि निर्माते JIO STUDIOS ने बाईपण भारी देवा सिनेमाचा लेटेस्ट बॉक्स ऑफीस रिपोर्ट जारी केलाय. यात पहायला मिळतं की, बाईपण भारी देवा सिनेमाने ७६. ०५ कोटींची कमाई केलीय.

२०२३ मध्ये जे मराठी सिनेमे रिलीज झालेत त्या सर्व सिनेमांमध्ये बाईपण भारी देवा सिनेमाची कमाई ऐतिहासीक म्हटली जाईल. मराठी सिनेमांसाठी निश्चितच हा गौरवाचा क्षण आहे. याशिवाय बॉलिवूडचे गदर 2 आणि OMG 2 हे मोठे सिनेमे समोर असुनही बाईपण भारी देवा चा कमाईचा आकडा वाढत चाललाय.

दिग्दर्शक केदार शिंदेंची खास पोस्ट

"भारतमाता की जय... बाईपण भारी देवा या सिनेमाने आणखी भरारी मारली.. खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टी स्वतंत्र झाली. सहा लक्ष्मींच्या पावलाने चित्रपटगृहात गर्दी सुरू झाली आणि ती इतर सिनेमांनाही फायद्याची ठरली!! एक स्त्री घर चालवते तर, सिनेमा नक्कीच चालवू शकते. याची ग्वाही या सिनेमाच्या निमित्ताने दिली गेली. लवकरच ५० वा दिवस साजरा करू.

सहकुटुंब सहपरिवार आता गर्दी होते आहे. पुढची वाटचाल सोपी नाही पण अवघडही नाही. कारण तुम्ही सोबत आहात. श्री स्वामी पाठीशी आहेत. आणि श्री सिद्धिविनायकाचा महाप्रसाद टप्प्या टप्यावर मिळतो आहे.." अशी पोस्ट केदार शिंदेंनी लिहीली आहे.

बाईपण भारी देवा चा सिक्वेल येणार?

बाईपण भारी देवा सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्ये बाईपण भारी देवा ची कथाकार वैशाली नाईक बाईपण.. साठी काम केलेला लेखक, दिग्दर्शक, पटकथाकार ओंकार दत्त पहायला मिळत आहेत.

"एक कहानी खतम तो दुजी शुरु हो गयी मामू.. बाईपण भारी देवा नंतर.. काहीतरी भारी.." असं कॅप्शन दिलंय. या फोटोला चाहत्यांनी पसंती दिलीय.

बाईपण भारी देवा सिनेमाच्या या टीमला पाहून अनेकांना सिनेमाच्या सिक्वेलची तयारी सुरु झालीय, अशा चर्चा सुरु झाल्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा…; महादेवीसाठी कुणाल कामरा मैदानात, नव्या ट्विटनं पुन्हा अडचणीत येणार?

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

SCROLL FOR NEXT