Bambai Meri Jaan Trailer esakal
मनोरंजन

Bambai Meri Jaan Trailer : 'ईमानदारी का क्या करोगे?' उत्तर ऐकायचयं, तर मग 'बम्बई मेरी जान'चा ट्रेलर एकदा पाहाच

अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेमध्ये सत्तरीच्या काळातील मुंबईचे दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे.

युगंधर ताजणे

'Bambai Meri Jaan' नावाच्या मालिकेची जोरदार चर्चा रंगली आहे. त्याला कारणही तसेच आहे. या मालिकेचा ट्रेलर आता सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून त्याला अल्पावधीत मिळालेला प्रतिसादही मोठा आहे. केके मेननची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेची अनेक दिवसांपासून चर्चा होती.

अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेमध्ये सत्तरीच्या काळातील मुंबईचे दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. तेव्हा मुंबईमध्ये असणारी गुन्हेगारी, गुन्हेगारी विश्वाचे धागेदोरे, वेगवेगळे गुंड, त्यांच्या टोळ्या आणि टोळीयुद्ध यावर आधारित मालिकेतून एका बड्या गुंडाची कथा उलगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांच्या हातावर नेहमीच तुरी देत सटकणाऱ्या त्या गुंडानं साऱ्या जगात आपल्या नावाची वेगळी ओळख तयार केली. पण याची सुरुवात कशी झाली, हे सांगणारी सीरिज म्हणून 'Bambai Meri Jaan' कडे पाहावे लागणार आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

'Bambai Meri Jaan' मधील संवाद हे फारच बोलके आणि प्रभावी आहेत. त्यांची गोष्टच वेगळी आहेत. त्यातील काही संवादाचा उल्लेख करायचा झाल्यास, जब इमानदारी भूख से टकराती है तो हमेशा हारती है. मैं ईमानदार था, पर दारा भूखा था...केके मेमनच्या आवाजातील या संवादांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी देखील केके मेननच्या स्पेशल ऑप्स सीरिजने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. या सीरिजमध्ये १९७० च्या काळातील मुंबईचे दर्शन घडवण्यात आले असून तत्कालीन शहरातील राजकीय, सामाजिक परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे.

'Bambai Meri Jaan' ची निर्मिती एक्सेल मीडिया आणि रितेश सिद्धवानी, कासिम जगमागिया आणि फरहान अख्तर यांनी केली आहे. ही वेबसीरिज प्रसिद्ध लेखक हुसैन झैदी यांच्या पुस्तकावर आधारित असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचे दिग्दर्शन शौजात सौदागर यांनी केले असून त्यात के के मेमन, अविनाश तिवारी, क्रितिका कामरा आणि निवेदिता भट्टाचार्य, अमायरा दस्तूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

केके मेमनविषयी बोलायचे झाल्यास तो गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये कार्यरत आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. त्याला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. यापूर्वी केके मेमनच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. बॉलीवूडमधील सर्वाधिक प्रभावी आणि प्रतिभावान कलाकारांमध्ये केके मेमनच्या नावाचा समावेश करावा लागेल. त्यानं स्वताच्या हिंमतीवर आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा केके मेननच्या यापूर्वीच्या मालिकांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT