Banita Sandhu AP Dhillon: Esakal
मनोरंजन

Banita Sandhu AP Dhillon: श्रीदेवीच्या लेकीला नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय रॅपर एपी ढिल्लन

पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक एपी ढिल्लन आणि अभिनेत्री बनिता संधू यांनी त्यांचे नाते अधिकृत केले आहे.

Vaishali Patil

Banita Sandhu AP Dhillon: पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक एपी ढिल्लन हा गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. आता तो पुन्हा त्याच्या आपल्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे. एपी ढिल्लन त्याच्या गाण्यांनी सगळ्यांच्या मनावर राज्य करतोय. तो त्याच्या गाण्याच्या माध्यमातुन सोशल मीडियावर अधिराज्य गाजवतो.

एपी ढिल्लन हा पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतला सर्वात लोकप्रिय गायक आहे. त्याच्या चाहत्यांची संख्याही काही कमी नाही. त्यांची गाणी रिलीज होताच ती सोशल मीडियावर ट्रेंड करतात. मात्र आता तो वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे.

एपी हा श्रीदेवीची लेक खुशी कपुरला डेट करत असल्याच्या अफवा परसल्या होत्या. त्याच कारण ठरलं ते एपीचं गाणं. त्याने या गाण्यात खुशी कपूरचे नाव घेत डेटिंगच्या बातम्यांना हवा दिली होती. मात्र आता त्याने तो कोणाला डेट करत आहे. याचा खुलासा केला आहे. एपी ढिल्लनला गायक अभिनेत्री बनिता संधूला डेट करत असल्याचं कळतयं.

बनिता संधूसोबत एपीसोबत अनेकदा दिसली होती. त्याचे एकत्र अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. नुकतच एपी ढिल्लन आणि बनिता यांचे एक व्हिडिओ गाणे रिलीज झाले. ज्यात दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खुपच आवडली.

दरम्यान, बनिता संधूने एपी ढिल्लनसोबत तिच्या नात्याची पुष्टी केली आहे. बनिताने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात बनिता आणि एपी स्टाईलमध्ये एकत्र दिसताय. हे फोटो शेयर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'माझ्या प्रेमासोबत.' सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सर्वत्र फक्त एपी आणि बनिताच्याच चर्चा रंगल्या आहेत.

एपी ची 'एपी ढिल्लन: फर्स्ट ऑफ अ काइंड' ही डॉक्यूमेंट्री-सीरीज प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली. यावेळी एपी ढिल्लनने देखील त्यांच्या डेटिंगला अधिकृत केले आहे.

तर बनिता संधू ही 11 वर्षाची असल्यापासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. तिने 25 व्या वर्षी तिने वरुण धवनसोबत 'ऑक्टोबर' चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर बनिता विकी कौशलसोबत 'सरदार उद्यम सिंह' चित्रपटात दिसली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ashok Saraf : कार्यक्रम अशोक सराफ यांच्या पुरस्काराचा, चर्चा मुश्रीफ, बंटी पाटील, उदय सामंत यांच्या राजकीय टोलेबाजीची, मामाही म्हणाले...

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

Hot Chocolate For Periods: पीरियड्समध्ये हॉट चॉकलेट का प्यावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT