takatak 2 : टकाटक या चित्रपटाने मराठी चित्रपटांच्या यादीत एक वेगळा विषय मांडला. बोल्ड स्वरूपातील हा विषय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. अभिनेता प्रथमेश परब (prathmesh parab) याची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बोल्डनेस सोबतच तरुणाईला एक महत्वाचा संदेश देणारा ठरला. तरुणाई ऐन वयात कोणत्या चुका करते यावर भाष्य करणारा हा चित्रपट होता.पण विनोदी शैलीने तो मांडण्यात आला. या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक मिलिंद कवडे दुसरा भाग घेऊन सज्ज झाले आहेत. 'टकाटक 2' 18 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. पण त्यापूर्वी एक मोठी गोष्ट समोर आली आहे. या चित्रपटात मराठीतील अजरामर असे 'हृदयी वसंत फुलताना' हे गाणे देखील असणार आहे. याबाबत चित्रपटाच्या टीम ने नुकतीच घोषणा केली. (banwa banwi movie famous song hridayi vasant fultana remake in takatak 2 movie prathamesh parab ajikya raut)
मराठी चित्रपटाच्या इतिहसतीलएक आजारामर कलाकृती म्हणजे 'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट. 1988 साली आलेला हा चित्रपट आज 34 वर्षांनंतरही तितक्याच आवडीने पाहिला जातो. कित्येकदा बघूनही पुन्हा पुन्हा बघवासा वाटेल अशा या चित्रपटाची गाणीही तुफान गाजली. त्यापैकीच एक गाणे म्हणजे 'हृदयी वसंत फुलताना'. अजूनही हे गाणे प्रत्येकाच्या ओठांवर आहे. पण आता हे गाणे पुन्हा एकदा नव्याने आपल्यासमोर येणार आहे. 'टाकाटक 2' या चित्रपटात हे गाणे नव्या बाजात प्रदर्शित होणार आहे.
हे गाणे कोणी गायले, कुणी संगीतबद्ध केले, कोण कलाकार यामध्ये आहेत याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. परंतु निर्मात्यांनी हे गाणे नव्याने करण्यासाठी पर्पल बुल एंटरटेनमेंट पॅरिस-मुख्यालय असलेल्या Believe (बीलिव्ह) डिजिटल म्युझिक कंपनीकडून या गाण्याचे रुपांतरण आणि संक्रमण अधिकार मिळवले आहेत. लवकरच हे गाणे आपल्या भेटीला येईल. 'टकाटक 2' मध्ये अभिनेता प्रथमेश परब, अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजेशिर्के, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे असे तरुण पण इरसाल कलाकार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.