bhima koregaon poster 
मनोरंजन

ऐतिहासिक घटनेवर आधारित 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' सिनेमाचं पोस्टर रिलीज

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालाच्या बहुचर्चित 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. अर्जुन रामपालने स्वत: या सिनेमाचं पोस्टर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. हा ऐतिहासिक आणि बहुचर्चित सिनेमा पुढच्या वर्षी 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अर्जुन रामपालसोबत अभिनेत्री सनी लिओनी, अभिमन्यू सिंह हे देखील दिसणार आहेत.

अभिनेता अर्जुन रामपालने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये त्याचा हटके लूक पाहायला मिळत आहे. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये अर्जुनची वाढलेली दाढी, लांब केस आणि हातात शस्त्र दिसत आहे. त्यामुळे अर्जुनचा हा लूक एखाद्या योद्ध्याप्रमाणे दिसतोय. या पोस्टरला कॅप्शन देताना अर्जुनने लिहिलंय, ज्या घटनेमुळे माझं मन हेलावून गेलं आणि मला खात्री आहे तुमचंही मन हेलावेल अशा या ऐतिहासिक घटनेचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे'. त्यामुळे येत्या 2021 ला #TheBattleofBhimaKoregaon सज्ज व्हा,' असे कॅप्शन अर्जुनने या पोस्टरला दिलं आहे.

1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटीश सैनिकांदरम्यान युद्ध झालं होतं. या युद्धात ब्रिटिशांनी विजय मिळवला. त्यावेळी पेशव्यांविरुद्ध लढलेल्या त्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर महार समाजाचे सैनिक होते. दरवर्षी या लढाईत महार समाजातील सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते. हे युद्ध भीमा कोरेगावची लढाई या नावानं प्रसिद्ध आहे. जाणकारांच्या मते, दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं 28 हजारांचं सैन्य पुण्यावर हल्ला करण्यासाठी सज्ज होतं. यावेळी आक्रमणादरम्यान त्यांच्यासमोर ब्रिटीश सैन्याची कुमक असलेली तुकडी उभी ठाकली. या तुकडीत 800 सैनिकांचा समावेश होता. पेशव्यांनी कोरेगावस्थित ईस्ट इंडिया कंपनीवर आक्रमणासाठी 2000 सैनिकांचा समावेश असलेली फौज पाठवली होती.

फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडियाच्या कंपनीच्या या तुकडीनं 12 तास खिंड लढवली आणि पेशव्यांना जिंकू दिलं नाही. यानंतर पेशव्यांनी निर्णय बदलला आणि ते परतले, असा उल्लेख तत्कालीन इतिहासावरच्या पुस्तकात सापडतो. दरम्यान ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडीत भारतीय वंशाचे काही सैनिक होते. यापैकी अनेक जण हे महार समाजाचे होते. हे सगळेजण बॉम्बे नेटिव्ह इन्फॅन्ट्री विभागाशी संलग्न होते. म्हणूनच ही घटना इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे म्हटलं जातं.  

the battle of bhima koregaon poster released actor arjun rampal share on social media  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT