Bawaal Controversy Esakal
मनोरंजन

Bawaal Controversy: वरुण-जान्हवीच्या बवालमुळे इस्रायलमध्ये 'बवाल'! 'त्या' सीनवर घेतला आक्षेप

इस्रायल दूतावासाने 'बावल' या चित्रपटातील काही दृश्यांवर आपत्ती दर्शवली आहे

Vaishali Patil

Bawaal Controversy: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा 'बावल' हा चित्रपट नुकताच OTT वर प्रदर्शित झाला. या चित्रपटात दोन्ही कलाकारांनी केलेल्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत असतांनाच आता इस्रायल दूतावासाने या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप दर्शवला आहे.

या चित्रपटात इतिहास विषयाचा शिक्षक म्हणून अजय दीक्षित म्हणजेच वरुण धवन आणि साधारण गृहिणी बनलेली निशा म्हणजेच जान्हवी कपूर यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात इतिहास विषयाचा शिक्षक असल्यामुळे अनेक ऐतिहासिक दाखले देण्यात आले आहे.

त्यातच आता इस्रायल दूतावासाने चित्रपटातील दुसऱ्या महायुद्धाच्या दृश्यावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात वैवाहिक आयुष्यातील भांडणाची तुलना कलहाची तुलना ऑशविट्झशी आणि लोभी लोकांची तुलना हिटलरशी केली आहे ज्यावरुन आता हा वाद सुरु झाला आहे.

चित्रपटात दाखवण्यात आलेल्या या सीनमध्ये अजय दीक्षित (वरुण धवन) आणि निशा (जान्हवी कपूर) हे दोघे परदेशी फिरण्यासाठी जातात.

ते दुसरं महायुद्ध झालेल्या ठिकाणांभोवती फिरतात. यावेळी निशा म्हणते की, “आपण सर्वच थोड्या फार प्रमाणात हिटलरसारखे आहोत, नाही का? प्रत्येक नातं स्वतःच्या ऑशविट्झमधून जातं. त्याचबरोबर या चित्रपटात गॅस चेंबरमध्यील क्रूरताही दाखवली आहे ज्यामुळे त्या दोघांमधील नातं बदलत.

आता या प्रकरणात इस्रायलच्या दूतावासाने एक ट्विट केले आहे. ज्यात ते म्हणतात की, "होलोकॉस्टचं महत्त्व कमी दाखवणाऱ्या 'बावल' चित्रपटामुळे इस्रायली दूतावास त्रस्त आहे." चित्रपटात काही शब्दांचा वापर करताना चुकीची निवड करण्यात आली होती.

कोणताही दुर्भावनापूर्ण हेतू नव्हता असा आमचा विश्वास असताना, ज्यांना होलोकॉस्टच्या भीषणतेबद्दल पूर्णपणे माहिती नाही अशा सर्वांना आम्ही त्याबद्दल स्वतःला शिक्षित करण्याचे आवाहन करतो.

भारतातील इस्रायली दूतावासाच्या नाओर गिलन यांनी ट्विट केले की, "होलोकॉस्टचे महत्त्व कमी करणाऱ्या 'बावल' चित्रपटामुळे इस्रायली दूतावास त्रस्त आहे.

चित्रपटात काही संवादही चुकीच्या पद्धतीने वापरे गेले आहेत. आमचा विश्वास आहे की यात कोणताही वाईट हेतू नाही आहे, ज्यांना होलोकॉस्टबद्दल जास्त माहिती नाही त्यांना आम्ही यााबद्दल माहिती करुन घ्यावी याचे आवाहन करतो.

आमचा दूतावास या विषयावरील शैक्षणिक सामग्रीचा प्रसार करण्यासाठी सतत काम करत आहे आणि अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आम्ही तुम्हा सर्वांशी संवाद साधायला तयार आहोत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT