astad kale and swapnali patil 
मनोरंजन

आस्ताद-स्वप्नालीच्या रजिस्टर मॅरेजचा थाटच निराळा! 

स्वाती वेमूल

'बिग बॉस मराठी' फेम आस्ताद काळे व अभिनेत्री स्वप्नाली पाटील यांनी 'व्हॅलेंटाइन डे'चं औचित्य साधत रजिस्टर मॅरेज केलं. १४ फेब्रुवारी रोजी पुण्यात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्न केलं. सेलिब्रिटींचं लग्न म्हणजे शाही थाट आणि धामधूम पाहायला मिळते. मात्र आस्ताद-स्वप्नालीने रजिस्टर मॅरेज करत एक वेगळाच आदर्श चाहत्यांपुढे ठेवला. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. 'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोमध्ये आस्तादने स्वप्नालीसोबतचं त्याचं नातं जगजाहीर केलं. 

लग्नासाठी आस्ताद आणि स्वप्नालीने केलेला लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. लाल आणि सोनेरी रंगाची साडी, त्यावर भरजरी दागिन्यांमध्ये स्वप्नालीचं सौंदर्य खुलून दिसतंय. तर आस्तादने शेरवानी आणि शाल परिधान केला होता. या लग्नसोहळ्याला हर्शदा खानविलकर, अभिजीत केळकर, संग्राम सामेल, मेघा धाडे हे सेलिब्रिटी उपस्थित होते. 

आस्ताद आणि स्वप्नालीने 'पुढचं पाऊल' या मालिकेत एकत्र काम केलं होतं. याच मालिकेच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. स्वप्नालीने नुकतीच 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तर दुसरीकडे 'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोच्या पहिल्या सिझनमध्ये हजेरी लावल्याने आस्ताद प्रकाशझोतात आला होता. सध्या तो 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारतोय. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT