BBC Releases Investigative Documentary on Jiah Khan Death
BBC Releases Investigative Documentary on Jiah Khan Death 
मनोरंजन

जिया खानच्या आत्महत्येवर बीबीसीकडून ' डॉक्युमेंटरी'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - जगातील जे सर्वोत्तम माहितीपट तयार केले गेले आहेत त्याच्या निर्मिती प्रक्रियेत बीबीसीचे योगदान महत्वाचे आहे. विषयाची निवड, त्यात केलेले संशोधन, त्यासाठी केलेली मेहनत, पुराव्यांची करण्यात आलेली पडताळणी, त्यानुसार संहितेचे लेखन करणे यामुळे बीबीसीचे नाव अद्याप टिकून आहे. त्यांनी तयार केलेले माहितीपट आवर्जुन पाहणारा प्रेक्षकवर्ग आहे. त्यांनी आता एक वेगळ्या विषयावर माहितीपट तयार करण्याचे ठरवले आहे, पुढील काही दिवसांत तो माहितीपट जाणकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री जिया खान हिनं आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपविली होती. त्यावर आता बीबीसीनं एक शोधपर माहितीपट तयार केला आहे. तो लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. बीबीसीनं जियावर तीन भागातील माहितीपट मालिका तयार केली आहे. जियाच्या आत्महत्येच्या तपासावर आधारित पहिल्या तीन भागांची ही मालिका सर्वांसाठी एक उत्सुकतेचा विषय आहे. मात्र सध्या ती केवळ युके मध्ये असणा-या प्रेक्षकांसाठीच उपलब्ध करुन देण्यात आली आहे. भारतातही ती प्रसिध्द करण्याचा कंपनीचा विचार असल्याचे सांगण्यात आले आहे.

माहितीपटाचा पहिला भाग हा 58 मिनिटांचा असून 11 जानेवारीला तो युके मध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. 2007 मध्ये जियानं प्रसिध्द दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या निशब्द या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. तसेच ती आमिर खान सोबत गजनीमध्येही दिसली होती. त्यानंतर 2013 मध्ये तिनं मुंबईतीत तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्या घटनेचा तपास मुंबई पोलीस आणि कालांतरानं सीबीआयनं केला. सीबीआयनं जियानं आत्महत्या केल्याचे जाहिर केले होते. यासगळ्या तपासावर जियाच्या आईनं नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी लंडनमधील एका प्रसिध्द कायदेविषयक फर्मला सगळी कागदपत्रे दाखविल्यानंतर त्यात काही त्रुटी असल्याचे समोर आले होते.

बीबीसीच्या वतीनं हा माहितीपट 11 ते 13 जानेवारी दरम्यान ऑनलाईन प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या तीन भागाविषयी डेली टेलिग्राफनं लिहिलं आहे की, पहिले दोन भाग  Death in Bollywood या नावानं आहे. दुसरा भाग investigation वर आहे. त्यात काही अंशी जियाच्या कुटूंबातील सदस्यांशी संवाद साधण्यात आला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT