be aware kiran mane suggest vikas sawant bigg boss marathi 4 sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: सावध राहा! किरण मानेचा विकासला सल्ला की कानभरणी?

अभिनेता किरण मानेने विकास सावंतला घरच्यांविरुद्ध सल्ला दिल्याने आता पुन्हा राडा होणार.

नीलेश अडसूळ

bigg boss marathi: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज किरण माने - विकास तर दुसरीकडे रोहित, अमृता देशमुख आणि अक्षय केळकर यांची चर्चा रंगताना दिसणार आहे. किरण माने पुन्हा एकदा विकासला इतर स्पर्धक कसे आहेत, ते जे बोलतात त्यापेक्षा ही खूप वेगळे आहेत, त्यांच्या भावना वेगळ्या आहेत असे सांगताना दिसणार आहे. हे सांगण्यामागे किरणचा नेमका काय उद्देश आहे, विकासला तो भडकवत तर नाही ना.. हे आज कळेलच..

(be aware kiran mane suggest vikas sawant bigg boss marathi 4)

तर रोहित शिंदे, किरण मानेबद्दल बोलताना दिसणार आहे. तो म्हणतो, 'मला माहिती होतं किरण माने केस काढणार नाही. बच्चन साहेब आहेत ते असं कसं?' त्यावर अक्षयचे म्हणणे पडले, 'बाहेर जायची भीती असेल कशाला टक्कल करून बाहेर जावं.. असं पण असू शकतं... कारण तसं त्यांनी काहीच केलं नाहीये.' त्यावर अमृता म्हणाली, 'काही सांगता नाही येत. मला नाही वाटतं त्यांना वाटतं कि ते गेमच्या बाहेर जातील. मला वाटतं ते जानेवारीनंतर पण असतील या घरात', त्यांचे फॅन्स त्यांना इथेच ठेवतील.

दुसरीकडे, किरण माने विकासला सांगताना दिसणार आहेत, 'तुला कळलं ना आता तू टार्गेट आहेस ते. आता तू लय मोठं टार्गेट असणार आहेस. त्यामुळे सावध राहा. कोणी स्तुती जरी केली ना तर धन्यवाद मानून वटकायचं. तो आपल्या बाजूने असतोच असे नाही.' असे किरणने विकासला सांगितले आहे. आता याचे परिणाम काय होणार.. पुढे काय घडणार ही आजच्या भागात कळेल.

बिग बॉस मराठीचा खेळ सुरू होऊन आता ४० दिवस उलटले आहेत. रोज घरात नवीन राडा, नवे वाद होत आहेत. आज घरात कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. यामध्ये विकास आणि अमृता धोंगडे यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. शिवाय किरण माने आणि विकास सावंत यांच्यात मध्यंतरी फूट पडली होती. पण आता पुन्हा ते एकत्र आल्याने काहीतरी घडणार ही नक्की..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या भावात मोठा बदल! 10 ग्रॅम कितीला? पाहा तुमच्या शहरातील सोनं-चांदीचा ताजा भाव

मोबाईल नाही, पुस्तके वाचा; १८ वर्षांपूर्वी मुलांच्या हातात स्मार्टफोन देऊ नका! नितीश भारद्वाज यांचा पालकांना सल्ला

Live Updates Marathi : आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभेच्छा, भक्ती आणि सेवाभावाचा दिला संदेश

Chaturmas 2026 Dos & Don'ts: आजपासून चातुर्मासाला सुरुवात; या काळात काय करावं, काय टाळावं? जाणून घ्या नियम आणि धार्मिक महत्त्व

Commonwealth Games 2026 : भाजी विक्रेता, इ रिक्षा चालक... Jhandu Kumar ने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला जिंकून दिले पदक

SCROLL FOR NEXT