anushka sharma and virat kohli file image
मनोरंजन

आई होण्याआधी अनुष्काने विराटसमोर ठेवली होती 'ही' अट

विराट आणि अनुष्का त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात.

प्रियांका कुलकर्णी

सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा (anushka sharma) आणि खेळाडू विराट कोहली (virat kohli). दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. विराट आणि अनुष्का यांनी 2017 मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर तीन वर्षांनी 11 जानेवारी 2021 रोजी अनुष्का आणि विराटला कन्यारत्न झाले. तिचे नाव त्यांनी वामिका असे ठेवले. वामिकाच्या जन्माआधी अनुष्काने विराटसमोर एक अट ठेवली होती. अनुष्काने विराटला सांगितले होते की, सामान्य मुलांप्रमाणे तिच्या मुलांचा सांभाळ झाला पाहिजे. विराटच्या आणि तिच्या कामाचा कोणताही परिणाम त्यांच्या आयुष्यावर झाला नाही पाहिजे, याकडे विराटचे लक्ष असले पाहिजे.(before becoming a mother anushka sharma put one condition to virat kohli)

विराटने देखील त्यांच्या मुलांबद्दल एक गोष्ट शेअर केली आहे. विराट कोहली म्हणाला, 'गेल्या काही वर्षांमध्ये अनुष्कामुळे माझ्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. माझे स्वतःचे जीवन आहे. माझी फॅमिली आहे. माझ्या मुलांसोबत वेळ घालवण्याचा मला पूर्ण हक्क आहे. मी माझ्या करियर आणि कामाच्या गोष्टी कधीच घरी शेअर करत नाही. माझे पुरस्कार देखील घरात नसतील कारण जेव्हा मुले मोठी होतील तेव्हा त्यांना असे नको वाटायला की ते एका सेलिब्रिटींच्या घरातील आहेत'

विराट आणि अनुष्काने वामिकाला सोशल मीडिया आणि लाइमलाईटपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ते दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. वामिकाचा चेहरा सोशल मीडियापासून दूर राहिल याची काळजी विराट आणि अनुष्का घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada: रहिवाशांना गुडन्यूज! घरं रिकामी करण्यासाठी शिप्टींन चार्जेस देणार, आर्थिक मदतीसाठी म्हाडाचा मोठा निर्णय

EKA Mobility : इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, स्त्रीसन्मान अन् तरुणांना रोजगार; EKA Mobility चा तिहेरी विजय! वाचा सविस्तर यशोगाथा

T20 World Cup 2026: पाकिस्तानी सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये अव्वल अन् विकेट्स घेणाऱ्यांमध्ये अमेरिकन टॉपर! भारतीय कुठेत?

Money Lending Law: महाराष्ट्रातील सावकार अडचणीत येणार! कायद्यात मोठा बदल होणार; महाराष्ट्र सरकार महत्त्वाचं पाऊल उचलणार

Virar News : भाजपला धक्का! भाजप महिला मोर्चा प्रमुख ॲड. साधना धुरी यांचा बविआत प्रवेश

SCROLL FOR NEXT