Bengali actress Sreela Majumdar dies at 65 due to cancer drj96  SAKAL
मनोरंजन

Sreela Majumdar: लोकप्रिय अभिनेत्री श्रीला मजुमदार यांचं ६५ व्या वर्षी निधन

श्रीला मजुमदार यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे

Devendra Jadhav

Sreela Majumdar Death News: बंगाली चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री श्रीला मजुमदार यांचं निधन झालंय. आपल्या दमदार अभिनयाने बंगाली चित्रपटसृष्टीत ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रीने वयाच्या ६५ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.

रिपोर्ट्सनुसार, श्रीला या अनेक काळापासून कॅन्सरशी लढत होती. त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि 27 जानेवारीला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

(Bengali actress Sreela Majumdar dies at 65)

श्रीला यांचा कॅन्सरशी लढा

वृत्तानुसार, 13 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान श्रीला यांना टाटा मेडिकल कॅन्सर सेंटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना घरी आणण्यात आले.

श्रीला मजुमदार यांचे पती एस एन एम अब्दी यांनी सांगितले की, "गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये श्रीला यांची तब्येत बिघडली. त्या काळात त्या घरी होत्या. त्यांचा मुलगा सोहेल हा अभ्यासासाठी लंडनमध्ये होता. मात्र आईची प्रकृती खालावल्याने तो परत आला."

श्रीला मजुमदार यांची कारकीर्द

श्रीला मजुमदार यांनी त्यांच्या अभिनयाने बंगाली चित्रपटसृष्टीत गाजवली. श्रीला यांनी 1980 मध्ये मृणाल सेन दिग्दर्शित 'परशुराम' या चित्रपटातून फिल्मी करिअरची सुरुवात केली.

याशिवाय श्रीला यांनी 2003 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायसाठी चोखेर बाली या चित्रपटासाठी व्हॉईस डबिंग देखील केले होते.

श्रीला यांनी बंगालीसह हिंदी भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे. ज्यात 'खार्जी', 'अभिसिंधी', 'द पार्सल चोख', 'नागमोती', 'असोल नाकोल' आणि 'अमर पृथ्वी' या चित्रपटांचा समावेश आहे. श्रीला यांनी शबाना आझमी, स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाह यांसारख्या कलाकारांसोबतही काम केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Road Traffic Jam : पुण्यातील सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऑफिसच्या दिशेने निघालेल्यांना मनस्ताप

Kolhapur Accident Video : कोल्हापूरमध्ये मद्यपी ट्रॅक्टर चालकाने वृद्ध महिलेला उडवलं; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढणार

MPSC Success : संघर्ष ते यशाचे शिखर! सायकलवर भंगार गोळा करणाऱ्या वडिलांच्या कन्येची MPSC त राज्यात पहिली झेप

Mumbai CNG Shortage: सीएनजी कोंडीतून मुंबईकरांची सुटका, पुरवठा सुरळीत होताच पंपांवर गर्दी; ३ दिवसात कोट्यवधींचं नुकसान

SCROLL FOR NEXT