TMC MP Nusrat Jahan s Health Improves Released from Hospital 
मनोरंजन

नुसरत जहां झाली आई; मुलाला दिला जन्म

खासदार व अभिनेत्री नुसरत या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत.

स्वाती वेमूल

तृणमूल काँग्रेसच्या खासदार TMC MP आणि अभिनेत्री नुसरत जहां Nusrat Jahan यांनी गुरुवारी (२६ ऑगस्ट) मुलाला जन्म दिला. 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, बाळ आणि नुसरत या दोघांची प्रकृती ठीक आहे. नुसरत यांना बुधवारी रात्री कोलकाताच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रसुतीची तारीख ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीची होती. मात्र लेबर पेनमुळे त्यांना २५ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करावं लागलं.

नुसरत जहाँ गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. 19 जून 2019 मध्ये नुसरत यांचे लग्न निखिल जैनसोबत Nikhil Jain झाले. निखिल आणि नुसरत यांनी तुर्कीमध्ये डेस्‍ट‍िनेशन वेड‍िंग केले होते. नुसरत यांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअरदेखील केले होते. तुर्कस्थानमधील कायद्यानुसार नुसरत आणि निखिलचे लग्न झाले. भारतीय कायद्यानुसर हे लग्न वैध नाही. यासर्व गोष्टींमुळे नुसरत आणि निखिल यांच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू झाली.

नुसरत आणि बंगाली अभिनेता यश दासगुप्ता Yash Dasgupta हे रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. काही महिन्यांपूर्वी नुसरत आणि यश सुट्ट्यांसाठी राजस्थानला गेले होते. इतकंच नव्हे तर नुसरत यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करत असताना यश त्यांच्यासोबत होता, असं वृत्त 'इंडिया टुडे'नं दिलं आहे.


कोण आहे यश दासगुप्ता?

नुसरत आणि अभिनेता यश दासगुप्ता यांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. यशने 17 फेब्रुवारी 2021 मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने बंगालच्या निवडणुकीमध्ये चंडीतला या मतदार संघातून निवडणूक लढवली. त्यामध्ये त्याला अपयश मिळाले. यश हा अभिनेता, मॉडेल आणि राजकारणी आहे. यशने 'गँगस्टर' या बंगाली चित्रपटामधून रूपेरी पडद्यावर पदार्पण केले. 'ना आना इस देस मेरी लाडो' या मालिकेमधील अभिनयाने यशला विशेष लोकप्रियता मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT