BhaDiPa B.E. Rojgaar : मराठी वेबविश्वामध्ये ज्या मालिकेनं तुफान लोकप्रियता मिळवली त्या भाडिपाच्या बीई रोजगार वेबसीरिजला नेटकऱ्यांची जोरदार पसंती (Marathi Web Serise) मिळाली आहे. सध्या सोशल मीडियावर मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरिजमध्ये बीई रोजगारचे नाव घेता येईल. वेगळ्या धाटणीची कथा, संवाद, कलाकार आणि त्यांचा बोलका अभिनय यामुळे बीई (Entertainment News Trends) रोजगारानं वेगळीच ओळख निर्माण केली आहे. बीई रोजगार नावाची मालिका पाहिली नाही असा मराठी तरुण सापडणं विरळाच, असं म्हणणं कदाचित अतिशोयक्ती वाटेल. पण ती गोष्ट खरी आहे.
तीन बेरोजगार इंजिनिअर्सची ही गोष्ट आहे. त्यांची नावं पापड्या, पियु आणि अक्षय (Sai Tamhankar News) अशी आहेत. ती आता मराठी प्रेक्षकांना ओळखीची झाली आहेत. आपल्याला इंजिनियर्स झाल्यानंतर नोकरी मिळेल. भरभक्कम पगार असेल अशी अपेक्षा असणाऱ्या तरुणाईला मोठ्या निराशेचा सामना करावा लागतो. त्यांना अपेक्षित असणार यश काही मिळत नाही. मिळतो तो फक्त नकार. त्यामुळे (Marathi Actress) निराशेच्या गर्तेत जाणाऱ्या पापड्या, पियु आणि अक्षयनं शोधलेल्या नव्या संधीला प्रभावीपणे या मालिकेतून सादर करण्यात आले आहे. जे प्रेक्षकांना आवडले आहे.
एकीकडे वेगवेगळ्या विषयांवरील मालिकांचा भडिमार होत असताना मराठी मातीतील मराठी माणसाची जिव्हाळ्याची गोष्ट नेटकऱ्यांना भावली आहे. पुणे आणि इचलकरंजीमध्ये या मालिकेची शुटींग पार पडली. सगळ्याच बाबतीत ही मालिका उजवी ठरली आहे. युट्युबवर या मालिकेचा पहिला भाग हा फ्री मध्ये पाहता येतो. बीई रोजगारची मोठी गोष्ट म्हणजे त्यात मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरनं उत्कृष्ठ भूमिका साकारली आहे. यापूर्वी सई अशा भूमिकेत कधीही दिसली नव्हती. चाहत्यांनी सईच्या भूमिकेचं कौतूक केलं आहे. सईनं पियू नावाची भूमिका साकारली आहे.
विदर्भातील एका महाविद्यालयातून तिनं बीईची पदवी घेतली आहे. ती नोकरीच्या शोधात आहे. सईनं सोशल मीडियावर या मालिकेबाबतचा तिचा अनुभव शेयर केला होता. त्यात ती म्हणाली होती की, या मालिकेनं मला समाजातील खरी परिस्थिती काय आहे हे दाखवून दिलं आहे. ही मालिका केल्यानंतर मला जो प्रतिसाद मिळाला तो न विसरण्यासारखा आहे. ऑनलाईन कंटेट ज्या ताकदीनं येत आहे तो पाहता लोकांना एखादा विषय आवडला की बाकीच्या गोष्टी गौण असल्याचे दिसून आले आहे.
बीई रोजगार या मालिकेचे लेखन सौरभ शामराज यांनी केलं असून त्याचे दिग्दर्शन सारंग साठ्येनं केलं आहे. आतापर्यत या मालिकेचे सहा भाग प्रदर्शित झालेत. प्रत्येक शुक्रवारी एक भाग प्रदर्शित झाले होते. पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.