sarang sathaye  
मनोरंजन

'भाडिपा' फेम सारंग साठ्येची प्यारवाली लव्हस्टोरी!

स्वाती वेमूल

फेब्रुवारी म्हणजे प्रेमीयुगुलांचा महिना. ७ फेब्रुवारीपासून रोज डे, किस डे, चॉकलेट डे असे एकएक दिवस साजरे होतात आणि १४ फेब्रुवारी रोजी 'व्हॅलेंटाइन डे' साजरा केला जातो. व्हॅलेंटाइन वीकच्या निमित्ताने भाडिपामुळे (भारतीय डिजिटल पार्टी) प्रकाशझोतात आलेल्या सारंग साठ्येची हटके लव्हस्टोरी तुम्हाला सांगणार आहोत. 

सारंग आणि पॉला गेल्या सात वर्षांपासून एकत्र आहेत. 'टोरंटो फिल्म फेस्टिव्हल'ला एका पार्टीमध्ये या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. नंतर सारंग आणि अनुषा एक कार्यक्रम करत असताना कॅनडाहून एक मुलगी येणार असल्याचं समजलं. तिला भेटल्यावर कुठेतरी आधी पाहिल्याचं सारंगला पुसट आठवत होतं. पण पॉलाला मात्र टोरंटोला भेटल्याचं नीट आठवत होतं. त्यावेळी पॉलाला मराठी बोलता आणि समजता येत नसल्यानं सारंगच्या मित्रांनी त्याला कॅनडाहून सारंगची चाहती आली आहे, अशी चिडवाचिडवी सुरू केली. 

सारंगला पहिल्याच भेटीत पॉला आवडली होती. तिच्याशी बोलताना मराठीतून फ्लर्ट केलेलं अजूनही मला आठवतं, असं सारंगने एका मुलाखतीत सांगितलं होतं. पॉलाचे विचार, तिची काम करण्याची पद्धत हळूहळू सारंगला आवडायला लागली. या भेटीनंतर एकाच महिन्यात दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. सारंग, पॉला आणि अनुषा पुण्यात घर घेऊन एकत्र राहायला लागले. त्याआधी सारंगने घरी त्याच्या आई-वडिलांना पॉलासोबतच्या नात्याची कल्पना दिली होती. गेल्या सात वर्षांपासून हे दोघं एकत्र राहत आहेत. घरातील सगळ्या गोष्टी, काम, घरखर्च हे दोघं विभागून घेतात. 

पॉलाविषयी सारंगने एका मुलाखतीत सांगितलं, "ती वयाच्या अठराव्या वर्षी जपानला फिरून आली. कुठल्याही संस्कृतीत ती लवकर मिसळून जाते. भाडिपा (भारतीय डिजिटल पार्टी) हे तिचं बाळ आहे. कारण हे सुरू करण्याची संकल्पना तिची होती."
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Latest News : शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणीवर शरद पवारांचे भाष्य, पंतप्रधान मोदी बारामती दौऱ्यावर येणार पवार काय म्हणाले?

Raghav Chadha Voter List : राघव चड्ढांना मोठा धक्का! ड्राफ्ट मतदार यादीतून नाव गायब; म्हणाले- ही क्लार्कची चूक नाही तर...

विद्यानंद बापटांपूर्वी नारायण पेठेतील ‘PIL मॅन’ DJ विरोधात लढला होता! सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेला लढा

Marathi News Live Updates : राम मंदिर हे प्रभू रामांवरील श्रद्धेपोटी नाही, तर शोषणासाठी उभारले- नाना पटोले

पाकडे जगासमोर उघडे! Imam-Ul-Haq वर दोन वर्षांच्या बंदीची तलवार, तर मोहम्मद रिझवानची कारकीर्द संकटात; नेमका काय केलाय कांड?

SCROLL FOR NEXT