bhadipa present Chikatgunde 2 series release on 14 april on planet marathi
bhadipa present Chikatgunde 2 series release on 14 april on planet marathi sakal
मनोरंजन

Chikatgunde: जोरदार पाऊस आणि खोलीतून 'तो' आवाज येऊ लागला.. 'चिकटगुंडे - २' चा भन्नाट ट्रेलर..

नीलेश अडसूळ

Chikatgunde: भारतीय डिजिटल पार्टी म्हणजेच 'भाडिपा' प्रस्तुत 'चिकटगुंडे' ही लॉकडाऊनवर आधारित वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ८ विविध पात्रे, ४ वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या कथा आणि प्रेमभावना असा विषय असलेल्या या वेबसीरिजचा पहिला सीझन प्रचंड गाजला.

प्रेक्षकांना या वेबसीरिजचा दुसरा सीझन कधी येईल, याची उत्सुकता लागली होती. प्रेक्षकांचे पहिल्या सीझनवरचे प्रचंड प्रेम पाहून फार काळ उत्कंठा ताणू न देता 'प्लॅनेट मराठी आणि भाडिपा प्रस्तुत ‘चिकटगुंडे २'चा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला असून येत्या १४ एप्रिल रोजी पहिला एपिसोड प्लॅनेट मराठी ॲपवर प्रदर्शित होणार आहे.

(bhadipa present Chikatgunde 2 series release on 14 april on planet marathi)

गौरव पत्की दिग्दर्शित ‘चिकटगुंडे २’मध्येही सारंग साठे, श्रुती मराठे, सुहास शिरसाट, स्नेहा माझगांवकर, सुशांत घाडगे, चैतन्य शर्मा आणि पुष्कराज चिरपुटकर, श्रुती मराठे हेच कलाकार असून लॅाकडाऊनचे नियम थोडे शिथिल झाल्यानंतरचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये धमाल, गोंधळ, गंभीर असे सगळेच सीन दिसत आहेत. त्यामुळे आता पहिल्या एपिसोडमध्ये नेमकं काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय विलास बर्दापूरकर म्हणतात, "पहिल्या सिझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता सिझन २ प्लॅनेट मराठीवर झळकणार आहे. भाडिपासोबत काम करताना आनंद होतोय.

त्यांचा कंन्टेट हा नेहमीच उत्कृष्ट असतो आणि एक सामाजिक, महामारी सारखा विषय ज्याचे गांभीर्य जाऊ न देता घराघरांत घडणारी कथा अतिशय हलक्याफुलक्या, विनोदी पद्धतीने ‘चिकटगुंडे’मध्ये मांडण्यात आली आहे. सिझन २ चा नवीन एपिसोड दर शुक्रवारी मोबाईल, टिव्ही, कॅाम्प्युटरवर प्लॅनेट मराठीच्या ॲपच्या माध्यमातून पाहता येईल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT