manoj bajpayee sakal
मनोरंजन

'कोई मंत्र पढता है तो कोई नमाज' देशातील सध्यस्थितीवर मनोज वाजपेयी..

बॉलीवूडमधील संवेदनशील अभिनेता म्हणून ओळखला जाणारा मनोज वाजपेयीची धर्माची ढाल करून द्वेष निर्माण करणाऱ्यांना चपराक देणारी कविता होतेय व्हायरल..

नीलेश अडसूळ

'द फॅमिली मॅन'(The Family Man) मुळे मनोज वाजपेयीनं (Manoj Bajpayee) एक अभिनेता म्हणून पुन्हा लोकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. त्या सीरीजमध्ये त्यानं साकारलेला रफ अॅन्ड टफ पोलिस ऑफिसर लोकांना आवडलाय. सीरिजच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांनी भरपूर पंसंती दिली. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोज वाजपेयी हे खणखणीत वाजणारं नाणं आहे असं म्हटलं तर नक्कीच चुकीचं ठरणार नाही. केवळ वेब सिरीजच नाही तर चित्रपट आणि वैचारिक पटलावरही त्याने स्वतःच वेगळेपण दाखवल आहे. त्याच फॅमिली मॅनचा आज बड्डे...

त्यानिमित्तानं मनोज वाजपेयीची एक कविता चांगलीच व्हायरल होत आहे विशेष म्हणजे ही कविता सध्यस्थितीवर भाष्य करणारी आहे. गेल्या काही दिवसातील देशातील राजकीय सामाजिक वातावरण पूर्णतः गढूळ झाले आहे. धर्मांवरून माणसामाणसात भेद निर्माण होईल अशी स्थिती आहे. हिंदू आणि मुस्लिम यांच्यात नाना कारणाने तंटाजन्य स्थिती निर्माण झाली आहे. देशातच नाही महाराष्ट्रातही तीच स्थिती आहे. यावर मनोज वाजपेयी यांची 'भगवान और खुदा' ही कविता सडेतोड भाष्य करते. ही कविता सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

ही कविता मिलाप झवेरी यांनी लिहिली (milap zaveri) असून त्यांनीच संगीतबद्ध केली आहे. मिलाप झवेरी हे स्वतः उत्तम दिग्दर्शक आहेत. या कवितेचे अभिवाचन मनोज वाजपेयी यांनी केलं आहे. त्यांच्या आवाजाने शब्दांमध्ये जणू प्राण भरले आहेत. देशातील धार्मिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या या कविता धार्मिक प्रार्थना, दंगली यांचे संदर्भ येतात. या कवितेत 'देव आणि खुदा' एकत्र बसून देशातील धार्मिक गोष्टीवर चर्चा करताना दिसतात. मिलाप यांनी ही कविता स्वतःच्या अकाऊंटवरून शेअर केली असून काही तासात लाखो चाहत्यांनी त्याला पसंती दिली आहे.

"भगवान और खुदा आपस में बात कर रहे थे. मंदिर और मस्जिद के बीच मुलाकात कर रहे थे. कि हाथ जोड़े हुए हो या दुआ में उठे. कोई फर्क नहीं पड़ता है. कोई मंत्र पढ़ता है तो कोई नमाज पढ़ता है. इंसान को क्यों नहीं आती शर्म है, जब वह बंदूक दिखा कर पूछता है कि क्या तेरा धर्म है. उस बंदूक से निकली गोली न ईद देखती है ना होली, सड़क पे बस सजती है बेगुनाह खून की होली. भगवान और खुदा आपस में बात कर रहे थे, मंदिर और मस्जिद के बीच किसी चौराहे पर मुलाकात कर रहे थे." अशी ही कविता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT