Aksah Choudhary Accident Esakal
मनोरंजन

Aksah Choudhary Accident: अजूनही धक्क्यातच! अपघातातून थोडक्यात बचावलेल्या अभिनेत्यानं सांगितली आपबिती...

आकाश आपल्या पाळीव कुत्र्यासोबत कारमध्ये होता मात्र अपघाताच्या वेळी त्याने सीट बेल्ट लावला होता. त्यामुळे आकाशला कोणतीही दुखापत झाली नाही.

Vaishali Patil

 Aksah Choudhary Accident: 'भाग्यलक्ष्मी' फेम प्रसिद्ध मॉडेल आणि लोकप्रिय अभिनेता आकाश चौधरी सुट्टीसाठी लोणावळ्याला जाताना वाटेत त्याच्या कारला अपघात झाला.

कार अपघातातून आकाश थोडक्यात बचावला आहे. लोणावळ्यात त्याच्या कारला ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती कि त्यामुळे त्याच्या कारचे खुप नुकसान झाले.

आकाश आपल्या पाळीव कुत्र्यासोबत कारमध्ये होता मात्र अपघाताच्या वेळी त्याने सीट बेल्ट लावला होता. त्यामुळे आकाशला कोणतीही दुखापत झाली नाही.

आता त्यांची प्रकृती ठिक असल्याने अपघातानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या अपघाताचा त्याच्या मनावर खुप मोठा परिणाम झाला आहे. तो अजूनही त्याच धक्यात असल्याचं त्याने सांगितलं.

आकाश चौधरीने अपघातानंतर टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला की अपघाताच्या वेळी तो खुप घाबरला होता. ज्यावेळी ट्रकनं माझ्या कारला धडक दिली त्यावेळी नेमकं काय घडलं हे मला काहीवेळी समजलं नाही. आम्ही सुखरूप बाहेर पडलो, पण या घटनेने मला हादरवून सोडले.

मला खुप अस्वस्थ वाटत होतं. रात्री मला झोप आली नाही. रात्रभर मी त्या रस्त्यावर काय घडलं याचाच विचार करत होतो. आयुष्य किती अनपेक्षित आहे याची मला जाणीव झाली.

वैभवी उपाध्याय आणि देवराज पटेल यांच्या रस्ता अपघातात आकस्मिक मृत्यूनंतर, मला रस्त्यावर गाडी चालवताना खूप भीती वाटते.

तो ट्रकने जड वस्तूने भरलेला होता. मोठा अपघात होऊ शकला असता. आम्हाला सुरक्षित ठेवल्याबद्दल मी देवाची खूप आभारी आहे."

या अपघातानंतर आकाश आणि त्या ट्रक चालकात रस्त्यावर बराच वाद होता. अपघातानंतर अभिनेत्याची ट्रक चालकाशी चकमकही झाली. हे ट्रक चालक खुप असंवेदनशीलतेने वाहन चालवतात.

मात्र त्यावेळी पोलिसांनी खूप तत्परता दाखवली. त्यांनी येऊन चालकाला अटक केली. मात्र तो चालक खुप गरीब माणुस होता त्यामुळे आकाशने तक्रार मागे घेतली असं त्याने या मुलाखतीत सांगतिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT