Bharat jadhav, Ankush chaudhari, Kedar shinde maharashtra shaheer  SAKAL
मनोरंजन

Video: बऱ्याच वर्षांनी एकत्र थिरकले भरत - अंकुश - केदार.. Maharashtra Shaheer निमित्ताने जमली भट्टी

केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर सिनेमात अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत झळकणार आहे

Devendra Jadhav

Maharashtra Shaheer News: महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shaheer) सिनेमाची येत्या काहीच दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काहीच दिवसांपुर्वी सिनेमातील पहिलं रोमँटिक गाणं 'बहरला हा मधुमास' प्रेक्षकांच्या भेटीला आलं. हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड वर आहे.

नुकताच या गाण्यावर तीन जिगरी दोस्तांनी डान्स केलाय. ते म्हणजे अंकुश चौधरी - भरत जाधव आणि केदार शिंदे. अंकुश - भरत - केदार या तिघांची मैत्री मराठी इंडस्ट्रीत कायम चर्चेचा विषय राहिला आहे.

महाराष्ट्र शाहीर निमित्ताने अंकुश - भरत - केदार अनेक वर्षांनी एकत्र काम करत आहेत. हे तिघे एकत्र आले म्हणजे धम्माल तर होणारच.

नुकताच या तिघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत महाराष्ट्र शाहीर मधील बहरला हा मधुमास या गाण्यावर हे तिघे धम्माल डान्स करताना दिसत आहेत.

डान्स कोरिओग्राफर या तिघांना डान्स स्टेप शिकवत आहे. तिच्या मागे केदार - भरत - अंकुश हे तिघे डान्स करताना दिसत आहेत. या तिघांसोबत केदार शिंदेची लेक सना सुद्धा दिसतेय.

इतकी वर्ष उलटली तरी केदार - भरत - अंकुश यांची दोस्ती तशीच आहे. या तिघांनी करियरच्या सुरुवातीला जत्रा, ह्यांचा काही नेम नाही अशा सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.

आता महाराष्ट्र शाहीर निमित्ताने हे तिघे पुन्हा एकदा अनेक वर्षांनी एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहेत.

अवघ्या महाराष्ट्राला ज्यांच्या शाहीरी आणि पोवाड्यांनी वेड लावलं त्या शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहिर सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सिनेमाची निर्मिती केदार शिंदे यांची पत्नी बेला शिंदे यांनी केली आहे.

जय जय महाराष्ट्र माझा, येळकोट येळकोट अशा शाहीर साबळे यांनी रचलेली लोकप्रिय गाणी सिनेमात पाहायला मिळणार आहेत.

केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर सिनेमात अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत झळकणार आहे. २८ एप्रिल २०२३ ला महाराष्ट्र शाहीर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmadpur News : टाकळगाव येथील तरुणाचा मराठा आरक्षण आंदोलनात हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत उपोषणस्थळी मृत्यू

Latest Marathi News Updates : दहिसर टोल नाका होणार आणखी पुढे, परिवहन मंत्र्यांचा सरकारकडे प्रस्ताव

Nagpur Fraud News : ‘क्रिप्टो करन्सी’तून दुप्पट नफ्याचे आमिष पडले महागात; सायबर चोरट्यांकडून नोकरदाराची दीड कोटी रुपयांची फसवणूक

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी तरूणाची गळफास लावून आत्महत्या; अंबेजोगाईतील खळबळजनक घटना!

फक्त ५ महिन्यात सोडली ८.८ कोटींची नोकरी; गुगलनंतर मेटातूनही भारतीय इंजिनिअर पडला बाहेर

SCROLL FOR NEXT