bharat jadhav on lakshya 
मनोरंजन

भरत जाधवची भावनिक पोस्ट, ‘लक्ष्यामामांचा फोन आला आणि..’

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- मराठी सिनेइंडस्ट्रीतील सगळ्यांच्या कायम लक्षात राहणारा अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत यांनी १६ डिसेंबर २००४ रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या एक्झिटने मात्र सा-यांनाच हैराण केलं. लक्ष्मीकांंत बेर्डे यांनी साकारलेल्या भूमिका प्रत्येकाच्या मनात आजही कायम आहेत. त्यांच्याशी निगडीत आठवणी अनेकांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. अशीच एक आठवण अभिनेता भरत जाधवने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 

भरत जाधवने या पोस्टमधून त्याच्या आठवणीतला लक्ष्या मामा सगळ्यांसमोर आणला आहे. त्याने लिहिलंय,'खूप आठवणी आहेत. आम्हा नवोदितांना त्यांनी ज्याप्रकारे वेलकम केलं, आधार दिला, त्यांनी आपलं स्टारपण आम्हाला कधी जाणवू दिलं नाही. त्यामुळेच आम्ही त्यांना मामा म्हणून हाक मारू शकलो. खूप काही शिकलो त्यांच्याकडून. त्यांच्याबद्दल सांगायची सगळयात मोठी आठवण म्हणजे 'पछाडलेला' सिनेमा.

‘सही रे सही’ जोरात सुरू होतं. अशातच जानेवारी २००३ ला महेश कोठारे सरांनी 'पछाडलेला'साठी विचारलं आणि त्यांना लगेच काम सुरू करायचं होत. मला त्या एका वर्षात ऑगस्ट २००३ पर्यंत 'सही रे सही'चे जास्तीत जास्त प्रयोग करायचे होते. त्यामुळे मी त्यांना नकार कळवला. मध्ये काही महिने गेले आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लक्ष्या मामांचा फोन आला की, “तुझं झालं का ते नाटकाचं वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे… महेशला पटकन जाऊन भेट. मी तुझ्यासाठी त्याला थांबवून ठेवलंय. तो पिक्चर सोडू नकोस.”

मग त्याच रात्री उशिरा महेश सरांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि तिथून लक्ष्या मामांना कळवलं की मी 'पछाडलेला' करतोय. सांगायचा मुद्दा हा की, इतका मोठा माणूस, कोणालाही घेऊ शकले असते. पण त्यांनी ती एवढी मोठी संधी मला दिली. 'पछाडलेला'ला मी त्यांचा आशीर्वाद मानतो.' अशी आठवण भरत जाधव यांनी सांगितली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. गेलो दोन दिवस सोशल मिडियावर चाहते आणि सेलिब्रिटी त्यांच्या लक्ष्यासोबतच्या आठवणी फोटो आणि पोस्टच्या माध्यमातून शेअर करत आहेत.  

bharat jadhav shares a heartwarming note for late actor laxmikant berde on his death anniversary   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT