bhau kadam reaction about ashok saraf viral video  SAKAL
मनोरंजन

Bhau Kadam: "त्यांच्याबाजूला बसायची इच्छा होणार नाही कारण..." त्या व्हिडीओवरुन वाद झाल्यावर भाऊंची अशोक मामांविषयी प्रतिक्रिया

भाऊ कदम यांना अशोक मामांनी साधं बसायलाही विचारलं नाही म्हणून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली

Devendra Jadhav

भाऊ कदम हे मराठी मनोरंजन विश्वातील विनोदी अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले कलाकार. भाऊ कदम यांनी आजवर चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळवलं. काही दिवसांपुर्वी भाऊ कदम चांगले चर्चेत आले होते.

भाऊ कदम आणि अशोक सराफ यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत अशोक सराफ यांनी भाऊ कदम यांना बराच वेळ उभं ठेवलं, बसायला सांगितलं नाही म्हणुन प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. आता या संपूर्ण प्रकरणावर स्वतः भाऊ कदम यांनी मौन सोडलंय.

(bhau kadam reaction about ashok saraf viral video)

भाऊ कदम यांनी दिलं स्पष्टीकरण

भाऊ कदम यांनी त्यांच्या व्हिडीओवर आलेल्या लोकांच्या कमेंट्स वाचल्या. आणि अखेर त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणाबद्दल मौन सोडलंय. भाऊ कदम यांच्या म्हणण्यानुसार...

त्या दिवशी त्यांच्या नाटकाचा प्रयोग होता. तेव्हा त्यांना कळलं की अशोक मामा मेकअप रुममध्ये बसले आहेत. ते लगेचच मामांना भेटायला गेले.

भाऊ कदम का बसले नाहीत, हे आहे कारण

भाऊ कदम पुढे म्हणाले, त्यादिवशी त्यांना नाटकाच्या प्रयोगानंतर निघायची घाई होती. भाऊंना चला हवा येऊ द्या च्या शूटींगला जायचं होतं. त्यामुळे त्यांनी उभं राहणं पसंत केलं. याशिवाय त्यांनी मामांची विचारपूस केली.

अशोक सराफ यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तिमत्वासमोर उभं राहण्याची आमची पात्रता नाही. ते खूप मोठे कलाकार आहेत. जर मी त्यांच्या घरी असतो तर त्यांनी मला नक्कीच बसायला सांगितलं असतं. चहा वगैरे विचारला असता.

अशोक सराफ यांच्याविषयी मला नितांत आदर, गैरसमज पसरवू नका

भाऊ कदम यांनी शेवटी सांगितलं की, "त्यांना अशोक सराफ यांच्याविषयी नितांत आदर आहे. अशोक सराफ यांना भाऊ कदम खूप मानतात. त्यामुळे चुकीची अर्धवट आणि खोटी माहिती लोकांनी पसरवू नये. याशिवाय गैरसमज पसरवू नये". असं आवाहन भाऊ कदम यांनी केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT