TDM, TDM movie, tdm man zala malhari, bhaurao karhade SAKAL
मनोरंजन

TDM Movie: उधळुया प्रेमाचा भंडारा.. 'मन झालं मल्हारी' नवीन गाणं भेटीला

'टीडीएम' चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतील यांत शंका नाही

Devendra Jadhav

TDM Man Zala Malhari Song News: मराठी सिनेमे म्हटलं की गाणी ही वाजलीच पाहीजेत. सैराट असो की लवकरच रिलीज होणार्या महाराष्ट्र शाहीर सिनेमातली गाणी आजकाल बॉक्सऑफिसवर हिट आहेत. यातली बरीच गाणी ही रोमँटिक असल्याचं चित्र समोर आहे.

सध्या सिनेविश्वात रोमँटिक गाण्यांची क्रेझ जरा जास्तच पाहायला मिळतेय. अशातच 'टीडीएम' (TDM) या चित्रपटातील एका गाण्याने धुमाकूळच घातलाय.

आता यांत भर घालायला या चित्रपटातील दुसरे रोमँटिक गाणं सज्ज झाले आहे. 'मन झालं मल्हारी' असं गाण्याचं नाव असून बॉयफ्रेंड - गर्लफ्रेंड नात्याची गुंफण उलगडणार हे गाणं आहे.

(bhaurao karhade new marathi movie tdm new song man zala malhari out now)

या गाण्यातून प्रेमी युगुलांचा रोमँटिक अंदाज पाहणं लक्षवेधी ठरतय. प्रेम हा प्रत्येकाच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचं विषय असला तरी प्रेयसी आणि प्रियकराची प्रेमाची व्याख्या ही इतर नात्यातील प्रेमापेक्षा काहीशी निराळीच असते, याच हुबेहूब वर्णन या गाण्यातून घडतंय.

प्रेयसी आणि प्रियकराचं एकमेकांवर असलेलं प्रेम अगदी अचूक हेरत या गाण्यातून मांडलंय. गाण्याच्या शब्दांमध्येच इतका जिव्हाळा आहे की आपसूक हे गाणं ओठावर रेंगाळतय.

'टीडीएम' चित्रपटातील 'एक फुल' हे गाणं आज ट्रेंडिंग मध्ये आहेच आता 'मन झालं मल्हारी' हे गाणं ही प्रेक्षकांसमोर आलं असून रसिकांच्या दिलावर राज्य करतय.

या रोमँटिक गाण्याच्या संगीताची जबाबदारी संगीतकार वैभव शिरोळे याने पेलवली आहे. तर गाण्याच्या ओळी कुणाल गायकवाड आणि वैभव शिरोळे यांनी शब्दबद्ध केल्या आहेत.

प्रसिद्ध पार्श्वगायिका आनंदी जोशी आणि वैभव शिरोळे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने या गाण्याला चारचाँद लावले आहेत.

'टीडीएम' चित्रपटातील नवखे चेहरे म्हणजेच अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदीने या गाण्यावर धरलेला ठेका भन्नाट आहे.

हे नवखे कलाकार आहेत हे बोलणंच मुळात चुकीचं वाटतंय इतकी निरागसता, इतकी समज त्यांच्या भूमिकेत दिसत असून ही किमया नामवंत दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंची आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

'चित्राक्ष फिल्म्स' आणि ' स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली आहे. 'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर एक आगळावेगळा विषय ते या चित्रपटातून मांडणार आहेत.

'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटातील गाणी तर आजही लोकांना भुरळ पाडतायत यातच आता भर घालत 'टीडीएम' चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतील यांत शंका नाही. २८ एप्रिल २०२३ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखान्यासाठी आजपासुन धुमशान; उमेदवारी अर्ज आजपासुन २२ मे पर्यंत दाखल करता येणार, भोसले विरुद्ध मोहिते पुन्हा संघर्ष..

Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

SCROLL FOR NEXT