TDM, TDM movie, TDM movie review, TDM showtimings, bhaurao karhade,  SAKAL
मनोरंजन

TDM ला थिएटरमध्ये शो मिळेना.. दिग्दर्शक अन् कलाकार सर्वांसमोर हात जोडून रडले, व्हिडिओ व्हायरल

TDM सिनेमाच्या टीमला मात्र वेगळ्याच मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

Devendra Jadhav

TDM News: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात TDM (टीडीएम) चित्रपटाची हवा असलेली पाहायला मिळतेय. हा रोमँटिक चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. चित्रपट आणि या चित्रपटातील गाण्यांची क्रेझ प्रेक्षक वर्गामध्ये पाहायला मिळतेय.

'ख्वाडा', 'बबन' फेम भाऊराव कऱ्हाडेंच्या TDM या चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घातलाय. कायमच अस्सल मातीतले हिरे वेचून त्यांना अभिनयाची संधी देणाऱ्या भाऊराव कऱ्हाडे यांच्या याही सिनेमाची चर्चा होती.

पण TDM सिनेमाच्या टीमला मात्र वेगळ्याच मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

TDM सिनेमा पाहण्याची सर्वांना उत्सुकता आहे. इतकंच नव्हे तर पुण्यात TDM चे शो हाउसफुल झाले. परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा असतानाही केवळ कमी शो आहेत म्हणून TDM प्रेक्षकांना पाहता येत नाहीये.

आज नुकतंच TDM चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आणि मुख्य कलाकार कालिंदी निस्तने आणि पृथ्वीराज यांनी प्रेक्षकांना हात जोडून ही दयनीय अवस्था सांगितली.

सिनेमा प्रेक्षकांना आवडतोय, परंतु शो नसल्याने प्रेक्षकांना माघारी जावं लागतंय. या अवस्थेमुळे सर्व टीमच्या डोळ्यात पाणी आलं. "आमच्यावर प्रेशर आहे", असं म्हणत थिएटर मालकांनी हात वर केलेत. आता थिएटर मालिकांवर नेमकं कसलं प्रेशर आहे, याचा खुलासा मात्र झाला नाहीये.

नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर 'सिटी प्राईड मल्टिप्लेक्स' येथे कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. दरम्यान सिनेमाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी या प्रीमियर शोला उपस्थिती लावून चारचाँद लावले होते.

यावेळी 'टीडीएम'च्या प्रीमियरची कुणकुण लागताच सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सनी 'सिटी प्राईड मल्टिप्लेक्स कडे घाव घेतली. त्यामुळे भाऊसाहेब आता रील स्टार्स ला घेऊन चित्रपट करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

या प्रीमियर सोहळ्यावेळी अचानक एवढ्या संख्येनें आलेल्या इन्फ्लुएन्सर्स पाहून सर्वांची तारांबळ उडाली . सर्व इन्फ्लुएन्सर्सनी दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंना भेटण्याचा तगादा लावला. कोणते ही आढेवेढे न घेता भाऊराव कऱ्हाडें या इन्फ्लुएन्सर्स ना भेटले सर्वां बरोबर सेल्फी काढले.

एवढंच काय तर चक्क काहींनी भाऊराव कऱ्हाडें बरोबर रिल करण्याच्या आग्रह केला तो देखील त्यांनी पूर्ण केला आणि तसेच रील्स स्टार्स च्या कामाचे कौतुक देखील केले .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अटल सेतू' नंतर मुंबईत देशातील सर्वात लांब उड्डाणपूल बांधणार! पण कुठे अन् लांबी किती असणार? वाचा MMRDAचा नवा मास्टरप्लॅन

Crime: आधी अमानुष मारहाण; नंतर पँटमध्ये विंचू सोडला अन्..., सरकारी शाळेतील शिक्षकांचं ८ वर्षीय मुलासोबत धक्कादायक कृत्य

ICC कडून विश्वविजेत्या भारतीय संघाला भरघोस बक्षीस, पण BCCI ने रोहितसेनेपेक्षा हरमनप्रीतच्या संघाला दिली निम्मीच रक्कम!

Male Breast Cancer : महिलांप्रमाणे पुरुषांनाही होऊ शकतो ‘स्तनाचा कर्करोग’ ; जाणून घ्या, नेमकी लक्षणे काय?

Thane News: राजकीय कमानींचा वाहतुकीला अडथळा! ट्रेलर कमानीत अडकल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी; अडसर कधी दूर होणार?

SCROLL FOR NEXT